पुणे

पुरंदरमध्ये पुढील काळातही वज्रमूठ राहणार कायम

CD

सासवड, ता. २९ : ''नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या एकजुटीची वज्रमूठ आणि मतदारांचा विश्वास याचा विजय झाला आहे. यानिमित्त मतदारांनी बोलघेवड्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. यापुढील काळातही महाविकास आघाडीची वज्रमूठ अशीच राहील'' असे पुरंदर - हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी विजय सभेत सासवड येथे सांगितले.

पुरंदर तालुका आणि बारामती तालुक्यातील ४२ गावांचा समावेश असणाऱ्या नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आणि पुरंदर हवेलीचे आमदार जगताप यांच्या मार्गदर्शनाखालील महाविकास आघाडी पुरस्कृत सोमेश्वर सहकार विकास पॅनेलने १६ जागांवर मताधिक्य मिळवून विजय संपादन केला.
माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या शिवसेना-भाजप पुरस्कृत जय मल्हार शेतकरी पॅनेलच्या उमेदवारांचा धुव्वा उडविला.
निकालानंतर झालेल्या विजयी सभेत सर्व विजयी उमेदवारांसह आमदार संजय जगताप, सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, सुदाम इंगळे, दत्ता झुरंगे, प्रचार प्रमुख नंदकुमार जगताप, हेमंतकुमार माहूरकर, संभाजी झेंडे, माणिक झेंडे, प्रदीप पोमण, विठ्ठल मोकाशी, माऊली यादव, सुनीता कोलते, संभाजी काळाणे, गौरी कुंजीर, बाळासाहेब कामथे, अनिल उरवणे, बापू भोर, पुष्कराज जाधव, लालासो नलावडे, अनिल उरवणे, गणेश जगताप, तुषार माहूरकर, राजेंद्र धुमाळ, योगेश फडतरे, एकनाथ यादव, बाजीराव कुंजीर आदी उपस्थित होते.

आमदार संजय जगताप पुढे म्हणाले., नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचा अपेक्षित निकाल लागला असून काहींनी पैशांचा वापर केला. मात्र मतदारांनी त्यांना नकार देत महाविकास आघाडीच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतला. मागील पंचवार्षिक निवडणुकीत आघाडीच्या कामाची पावती यानिमित्त मतदारांनी दिली. सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन आणि मतदारांचेही मी यानिमित्ताने आभार मानतो. कारण हा विजय हीच पुढील काही निवडणुकांच्या विजयाची नांदी समजावी.
सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप म्हणाले., अजित पवार व संजय जगताप या लोकप्रतिनीधींवरील विश्वास मतदारांनी सार्थ ठरविल्याचा हा निकाल आहे. असेच निवडणूक निकाल यापुढे सर्व निवडणुकांत दिसतील. संभाजी झेंडे म्हणाले की, मतदार हा राजा असतो, हे या बाजार समितीच्या निकालाने दाखवून दिले. कार्यकर्ते, उमेदवारांचे उत्तम नियोजन, बैठका, संपर्क यालाही कौल मिळाला.
------
03578

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT