सासवड, ता. १ : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा २०२५ साठी पुरंदर तालुक्यातून मल्लांची निवड चाचणी कुस्ती स्पर्धा शुक्रवारी (ता. १०) सासवड (ता. पुरंदर) येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या छत्रपती शिवाजी कुस्ती संकुल येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती पुरंदर तालुका कुस्तीगीर संघाचे सचिव रवींद्रपंत जगताप यांनी दिली.
१८ व १९ जानेवारी रोजी कोंढवा बु. (पुणे) येथे जिल्हा स्तरावरील निवड चाचणी स्पर्धा होणार असून, त्यापूर्वी तालुक्यातून निवड चाचणी स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. निवड चाचणी स्पर्धेच्या नियोजनाबाबत तालुका कुस्तीगीर संघाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार संजय जगताप यांच्या सूचनेप्रमाणे सदस्यांची सासवड (ता. पुरंदर) येथे शनिवारी (ता. २८) बैठक झाली. याप्रसंगी जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, सदस्य अशोक झेंडे, उपाध्यक्ष पांडुरंग कामथे, सदस्य तात्या झेंडे, संतोष सोनवणे, विनोद जगताप, बाळासाहेब कोलते, गुलाब गायकवाड, रमेश जगताप, चंद्रकांत गिरमे, रघुनाथ जगताप, छत्रपती शिवाजी कुस्ती संकुलाचे व्यवस्थापक माऊली खोपडे, तानाजी जाधव आदी उपस्थित होते.
स्पर्धेसाठी वजनगट पुढीलप्रमाणे ः
बालगट- २५, २८, ३२, ३६, ४०, ४४, ४८, ५१, ५५ आणि ६० किलो. वरिष्ठ गट - गादी व माती विभाग - ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७९, ८६, ९२ आणि ९७ किलो. महाराष्ट्र केसरी किताब गट ८६ ते १२५ किलो.
बालगटासाठी जन्म तारीख १ जानेवारी २०११ ते ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत असावी. वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड किंवा पासपोर्ट देणे बंधनकारक आहे. सहभागी होणाऱ्या मल्लांची जिल्हा कुस्तीगीर संघाकडे नोंदणी असणे आवश्यक आहे. नसल्यास जिल्हा कुस्तीगीर संघाकडे अर्ज व रजिस्ट्रेशन फी भरून नोंदणी करता येईल.
-रवींद्रपंत जगताप, सचिव, पुरंदर तालुका कुस्तीगीर संघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.