पुणे

पुरंदरमध्ये नव्या रचनेत गट, गण ‘जैसे थे’

CD

सासवड, ता. १६ : पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणांची प्रारूप प्रभागरचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी नुकतीच जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, या प्रभागरचनेत पूर्वीचेच जिल्हा परिषदेचे चार गट आणि पंचायत समितीचे आठ गण कायम ठेवण्यात आले असून, त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या प्रारूप गट-गण रचनेबाबत नागरिकांना २१ जुलैपर्यंत हरकती आणि सूचना नोंदवता येणार आहेत. यापूर्वीही पुरंदरमध्ये चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गण होते. नव्या रचनेत तेच गट आणि गण ‘जैसे थे’ ठेवले आहे, केवळ वीर गणाचे नाव मांडकी झाले आहे.

गट व गणनिहाय समाविष्ट गावांचा तपशील
१. गराडे-दिवे जिल्हा परिषद गट
गराडे पंचायत समिती गण : भिवरी, पठारवाडी, आस्करवाडी, थापेवाडी, वारवडी, गराडे, सोमुर्डी, कोडीत बुद्रूक, बोपगाव, चांबळी, हिवरे, कोडीत खुर्द.
दिवे पंचायत समिती गण : झेंडेवाडी, दिवे, जाधववाडी, काळेवाडी, पवारवाडी, सोनोरी, आंबोडी, वनपुरी, उदाचीवाडी, गुऱ्होळी, सिंगापूर, वाघापूर, आंबळे, टेकवडी, कुंभारवळण.

२. माळशिरस-बेलसर जिल्हा परिषद गट
माळशिरस पंचायत समिती गण : रानमळा, कोथळे, धालेवाडी, पिंपरी, नाझरे सुपे, नाझरे क.प., माळशिरस, नायगाव, पांडेश्वर, पोंढे, राजुरी, पिसे, रिसे, मावडी सुपे.
बेलसर पंचायत समिती गण : भोसलेवाडी, खळद, शिवरी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, वाळूंज, तक्रारवाडी, बेलसर, निळूंज, पारगाव, राजेवाडी, पिसर्वे.

३. मांडकी-भिवडी जिल्हा परिषद गट
भिवडी पंचायत समिती गण : केतकावळे, कुंभोशी, घेरा पुरंदर, मिसाळवाडी, देवडी, चिव्हेवाडी, पूर-पोखर, काळदरी, बांदलवाडी, पानवडी, बहिरवाडी, दवणेवाडी, धनकवडी, मांढर, हरगुडे, पांगारे, खेंगरेवाडी, शिंदेवाडी, बोऱ्हाळवाडी, पिंपळे, सुपे खुर्द, भिवडी.
मांडकी पंचायत समिती गण : तोंडल, माहूर, सटलवाडी, परिंचे, नवलेवाडी, वीर, माळवाडी, समगीर वस्ती, लपतळवाडी, हरणी, मांडकी, पिसुर्टी, जेऊर.

४. नीरा शिवतक्रार-कोळविहिरे जिल्हा परिषद गट
कोळविहिरे पंचायत समिती गण : साकुर्डे, पिंगोरी, दौंडज, जेजुरी ग्रामीण, कोळविहिरे, जवळार्जुन, मावडी कडेपठार, नावळी, राख, कर्नलवाडी, गुळुंचे.
नीरा शिवतक्रार पंचायत समिती गण : वाल्हे, वागदरवाडी, आडाचीवाडी, सुकलवाडी, पिंपळे खुर्द, थोपटेवाडी, नीरा शिवतक्रार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dinesh Karthik: लॉर्ड्सवर जितेश शर्माला खरंच सिक्युरिटी गार्डने अडवलं? कार्तिकने सांगितलं Viral Video मागील खरी कहाणी

Odisha News: ओडिशात जोरदार निदर्शने; न्याय मिळेपर्यंत लढा! सौम्याश्रीच्या मृत्यूने ओडिशा ढवळले, बीजेडीचा सचिवालयावर मोर्चा रोखला

Slow Phone Charging: तुमचा फोन खूप हळू चार्ज होतोय? मग 'हे' 2 हॅक्स नक्की वापरा, तुम्हाला लगेच फरक दिसेल

Solapur Crime : डबा विसरली म्हणून घरी परतली..; स्नेहल बाथरूममध्ये गेली अन् श्रेयानं दरवाजा बंद करून..; कॉलेज तरुणीचा भयावह अंत

Rahul Gandhi: काश्मीरला राज्याचा दर्जा देणारे विधेयक आणा; राहुल गांधी आणि खर्गे यांची पंतप्रधान मोदी यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

SCROLL FOR NEXT