पुणे

सासडवडच्या पोलिस ठाण्यासमोरील ​निरुपयोगी वाहनांची विल्हेवाट लावा

CD

सासवड, ता. २६ : सासवड पोलिस ठाण्यासमोरून जाणाऱ्या पालखी महामार्गालगत पोलिस ठाण्याच्या संरक्षक भिंतीला लागूनच अनेक वर्षांपासून अपघात झालेली आणि वापरण्यायोग्य नसलेली वाहने धूळ खात पडून आहेत. यामुळे रस्त्याची एक बाजू व्यापली गेली आहे. अशा वाहनांची विल्हेवाट लावण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
महामार्गालगतच अनेक वर्षांपासून पडून असलेली ही वाहने आता पूर्णपणे गंजली आहेत. या वाहनांनी रस्त्याचा काही भाग व्यापला आहे. यात भर म्हणून, सासवड शहरात विविध कामांसाठी, तसेच पोलिस ठाण्यातील विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची वाहने देखील या वाहनांलगत थांबतात. यामुळे रस्ता आणखी कमी होतो, असे सामाजिक कार्यकर्ते संतोष एकनाथराव जगताप यांनी सांगितले.
महामार्गावरील अपघातांचा वाढता धोका लक्षात घेता ही निरुपयोगी वाहने लिलाव किंवा स्क्रॅप करून हटवण्यात यावीत. ज्याप्रमाणे वाहतूक पोलिस प्रशासनाकडून रस्त्यावर बेशिस्तपणे थांबलेल्या वाहनांवर कारवाई केली जाते. त्याप्रमाणे याकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे जगताप यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMO and Raj Bhavan renamed : मोदी सरकारचा मोठा निर्णय! ‘पीएमओ’ अन् ‘राजभवन’ नावात केला बदल

Pune News : ‘बदनामी करणाऱ्या महिलेवर पोलिसांनी कारवाई करावी’; सूत्रधाराचाही शोध घेणार- आमदार चित्रा वाघ

Beed Crime: गेवराईत राडा! अमरसिंह पंडितांचे स्वीय सहाय्यक अमृत डावकरांवर हल्ला

Video : भल्यामोठ्या नंदीवर बसून प्राजक्ता-शंभूराजची रिसेप्शनला ग्रँड एंट्री ! थाटात झालं स्वागत

Latest Marathi News Live Update : ही सर्व पद्धत योग्य वाटत नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT