सासवड, ता. २८ : राजेवाडी (ता. पुरंदर) गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी उद्योजक तानाजी जगताप यांची, तर उपाध्यक्षपदी संभाजी कोकाटे यांची बिनविरोध झाली. सरपंच दत्तात्रेय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात या निवडी करण्यात आल्या. याप्रसंगी तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब जगताप यांच्या हस्ते नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी सरपंच रामदास जगताप, सदस्य राजेंद्र शिंदे, नंदा जगताप, उद्योजक ज्ञानेश्वर जगताप, संतोष जगताप, तुषार जगताप, बबन राऊत, हरिभाऊ जगताप, महेंद्र जगताप यांच्यासह गावातील अनेक महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. राजेंद्र शिंदे यांनी प्रास्ताविक केले, तर ग्रामसेविका उज्ज्वला काळभोर यांनी आभार मानले.