पुणे

सीताफळाच्या बाजारभावामध्ये घसरण

CD

सासवड, ता. १३ : पुरंदर तालुक्यात सध्या सीताफळाचा हंगाम जोरात सुरू असताना बाजारात आवक वाढल्याने आणि परराज्यांतील मागणी घटल्याने सीताफळाच्या बाजारभावात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. मागील दोन ते तीन दिवसांत उत्तम प्रतीच्या सीताफळाचा बाजारभाव १५०० ते ४००० रुपयांवरून १००० ते २१०० रुपयांवर घसरला आहे.

सासवड येथील घाऊक फळ बाजारात दररोज सुमारे ५०० ते ६०० क्रेट सीताफळाची आवक होत आहे. याशिवाय डाळिंबाचे १५० क्रेट, अंजिराचे ३०० ते ४०० टब, तर गुलाबी पेरूच्या १५० बॅगा, गावरान पेरू व ललित आणि बाटली पेरूचेही जवळपास १०० क्रेट बाजारात येत आहेत.

सासवडच्या फळबाजारात बापू शेलार, गिरीश काळे, सागर काळे, गौरव काळे, महेश काळे, दीपक काळे, अजित पोमण, शरद काळे आदी स्थानिक व्यापाऱ्यांसह काही परप्रांतीय व्यापारी सीताफळ खरेदी करीत आहेत.
आणखी काही दिवस किंवा दिवाळीपर्यंत सीताफळाचे दर कमी राहण्याची शक्यता असल्याचे सासवड येथील फळविक्रेते हरून बागवान आणि नायगाव (ता.पुरंदर) येथील शेतकरी व फळांचे व्यापारी प्रमोद खळदकर यांनी सांगितले.

बाजारभाव घसरणीची कारणे
१. उष्णतेमुळे फळे लवकर पिकतात.
२. विक्रीसाठी बाजारात आवक वाढली
३. परराज्यांत पडणारा पाऊस तसेच स्थानिक फळांची वाढती आवक
४. परराज्यात सीताफळाच्या मागणीत घट


फळांचा बाजारभाव पुढीलप्रमाणे : प्रतिक्रेट (रुपयांत)
चांगल्या दर्जा........... १००० -२१००
लहान आकार........... ३००-७००
डाळिंब...........२०००-३५००
अंजीर...........३००-७००
गुलाबी पेरू (१५ किलो बॅग)...........२००-४००
गावरान पेरू...........१०००-१५००
ललित पेरू...........१५००
बाटली गुलाबी पेरू...........१०००-१२००

05608

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Couple killed : कोल्हापुरातील पती पत्नीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू नाही तर कुख्यात गुंडाने दगडाने ठेचून केला खून, कारण काय?

India vs Australia: जॉश हेझलवूडची अनुपस्थिती पथ्यावर? भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज होबार्टमध्ये तिसरा टी-२० सामना

Latest Marathi News Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंजाब दौऱ्यावर

IND vs AUS T20I लढतीपूर्वी दिग्गज खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती; म्हणाला, हा निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ...

Viral Video: ट्रेन, प्रवासी अन् महाकाय अजगर… तिघांची LIVE जुगलबंदी! हावडा मेलच्या स्लीपर कोचमध्ये काय घडलं?

SCROLL FOR NEXT