पुणे

​सासवडमधील घटनेच्या १७ दिवसांनंतर गुन्हा दाखल

CD

सासवड, ता. ४ : शहरातील पीएमपीएमल बसस्टॉप परिसरात १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी झालेल्या एका अपघाताप्रकरणी सासवड पोलिसांनी मृताच्या नातेवाइकांना शोधून तक्रार देण्यास भाग पाडल्यानंतर घटनेच्या तब्बल १७ दिवसांनंतर शुक्रवारी (ता. ४) सासवड पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल होऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरधाव वेगातील कारच्या धडकेत प्रेम लखन चव्हाण (वय ८ , रा. सासवड) या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर पियुष हनुमंत पावगे (वय २१, रा. आंदोरी, सातारा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, अपघाताची ही दुर्घटना १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास सासवड येथील पीएमपीएमल स्थानकाजवळ सासवड-जेजुरी मार्गावर घडली होती. फिर्यादी मृताचे काका विशाल बाळाराम चव्हाण (रा. पारगाव मेमाणे, ता. पुरंदर) यांनी दिलेली माहिती अशी की, त्यांचा पुतण्या प्रेम चव्हाण हा सायकलवरून रस्ता ओलांडत होता. त्याचवेळी पियुष हनुमंत पावगे (वय २१, रा. आंदोरी, सातारा) हा चालक मोटार (एमएच ११ डीएन ०६५७) भरधाव वेगात चालवत होता. या चालकाने रस्त्याच्या नियमांकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे प्रेमच्या सायकलला जोरदार धडक दिली. अपघातानंतर प्रेमला डोक्याला आणि डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने पुणे येथील खासगी रुग्णालयात व पुढील उपचारांसाठी त्याला ससून हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना तीन दिवसांनी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ​पोलिसांनी प्रेमच्या मृत्यूची माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिली. तरीही कोणीही नातेवाईक रुग्णालयात फिरकले नाहीत. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यासाठी सासवडचे पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी नातेवाइकांना शोधून रीतसर तक्रार नोंदविण्यास भाग पाडले. मृतदेह ताब्यात घेऊन अन्य सोपस्कार पूर्ण झाले. या प्रकरणाची अधिकृत तक्रार शुक्रवारी पोलिस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास सासवड पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar CM: बिहारचा नवा मुख्यमंत्री ठरला! 'या' नावावर शिक्कामोर्तब, अधिकृत घोषणा संध्याकाळी

Ayushman Bharat Scheme Update: आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! मोदी सरकारमुळे मिळणार ₹10 लाखांपर्यंत मोफत उपचार

IPL 2026: 'भारतात यशस्वी ठरलेल्या लोकांकडून शिकतोय अन् नोट्स घेतोय...' पंजाबच्या मॅचविनरने उघड केलं यशाचं गुपित

Maoist Song Dance Pune: पुण्यातील वसतिगृहात माओवादी आशय असलेल्या गाण्यावर नृत्य; Video Viral

SBI Whatsapp : स्टेट बँकेत अकाऊंट आहे? तुमच्यासाठी मोठी खुशखबर; घरबसल्या व्हॉट्सॲपवर होणार सगळं काम, पाहा काय आहे नवी सुविधा

SCROLL FOR NEXT