पुणे

विस्ताराअभावी ​सासवडला ‘ट्रॉमा सेंटर’ गेले

CD

​सासवड, ता. ३ : सासवड ग्रामीण रुग्णालयात सध्या केवळ ३० बेड्सची सोय आहे, ज्यामुळे येथे आयसीयू सुविधा देता येत नाही. रुग्णांची वाढती संख्या पाहता बेड्सची संख्या ५० करण्याची मागणी आहे, परंतु जागा नसल्याने मर्यादा येतात. ‘जागेअभावी येथील महत्त्वाचे ट्रॉमा सेंटर जेजुरीच्या रुग्णालयाकडे हलविण्यात आले. जागेची उपलब्धता झाल्यास, केवळ बेड्सची संख्या वाढवून आयसीयू सारख्या चांगल्या सुविधा देता येतील. आता ५० आणि भविष्यात १०० बेड्सच्या रुग्णालयाची आवश्यकता भासणार आहे, त्यासाठी ५ एकर जमिनीची मागणी आहे, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन अकमार यांनी सांगितले.
सासवड ग्रामीण रुग्णालय रुग्णसेवेत अत्यंत दक्ष असले, डॉक्टर वेळेवर उपस्थित असले आणि रुग्ण उपचारांवर समाधानी असले तरी, जागेचा तीव्र अभाव या रुग्णालयाच्या विस्ताराला मोठा अडथळा ठरत आहे. दररोज ३५० ते ४०० बाह्यरुग्णांची तपासणी होत असलेल्या आणि एक लाखांहून अधिक लोकसंख्येचा भार पेलणाऱ्या या रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात होईल; मात्र आजी-माजी आमदारांकडे जागेच्या प्रश्नावर पाठपुरावा करत असले तरी ठोस निर्णय होत नाही. ​२०१८ पासून वाढीव जागेसाठी पाठपुरावा सुरू आहे, शेजारील पंचायत समितीच्या इमारतीची मागणीही करण्यात आली आहे. मात्र, सदस्य नसल्याने आम्हाला निर्णय घेता येत नाही, असे सांगण्यात येते, असे डॉ. अकमार म्हणाले. ​सध्या एक वैद्यकीय अधीक्षक, तीन वैद्यकीय अधिकारी, पॅथॉलॉजी, फार्मासिस्ट आणि परिचारिकांसह स्वच्छता कर्मचाऱ्यांची ३५ पदे मंजूर आहेत, पण दररोजच्या रुग्णसंख्येसाठी (३५०-४००) १०० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.

​सध्याची सेवा प्रशंसनीय, पण ताण वाढतोय
​सासवडसह परिसरातील २५ ते ३० गावातील रुग्ण उपचारांसाठी येथे येतात. डॉक्टर, कर्मचारी आणि परिचारिका वेळेवर उपस्थित असतात.​ रुग्णालयात स्वच्छता चांगली असून सकाळी ९ पूर्वीच सर्व स्वच्छता केल्याचे निदर्शनास आले. बाह्यरुग्ण तपासणी सकाळी ९.३० ते दुपारी २ व दुपारी ३ ते ५ अशी आहे. शनिवारी सकाळी ९.३० ते अखेरचा रुग्ण तपासणीपर्यंत. रविवारीही तातडीच्या उपचाराची सुविधा उपलब्ध आहे.


खांदेदुखीसाठी हडपसर, फलटणमधील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करायला सांगितली होती, पण सासवडच्या ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी गोळ्या-औषधे दिली आणि चांगला आराम पडला.
- शहानूर बागवान, रुग्ण, हडपसर


रुग्णालयात श्वानदंशाच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्याबाबतच्या लसीची उपलब्धताही मुबलक आहे. मात्र, या घटनांवर मर्यादा आणण्यासाठी श्वानांचा बंदोबस्त करण्यासाठी सासवड नगर परिषद आणि ग्रामीण प्रशासनाला कळविले आहे. मात्र, याबाबत कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.
- डॉ. गजानन अकमार, वैद्यकीय अधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोन कोटींची लाच मागणाऱ्या PSIच्या घरात ५६ लाखांची रोकड, सोन्याचे दागिने अन् मालमत्तेची कागदपत्रे; झडतीत काय सापडलं?

MP Udayanraje Bhosale: लोकांवर अन्याय झाल्यावर आवाज उठवतोच: खासदार उदयनराजे: साताऱ्यातील मनोमिलनाेबाबत केलं माेठे विधान..

Ladki Bhin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी ! आजपासून खात्यात जमा होणार 'इतके' पैसे

Morning Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा न तळता आख्या हिरव्या मुगाचे वडे, लगेच लिहून घ्या रेसिपी

Sushma Andhare: फलटण महिला डॉक्‍टर आत्‍महत्‍याप्रकरणी चौकशीसाठी उच्‍चस्‍तरीय समिती नेमा: सुषमा अंधारे आक्रमक; पोलिस ठाण्‍यासमोर ठिय्‍या..

SCROLL FOR NEXT