पुणे

संगमेश्वर मंदिराचे सौंदर्य धोक्यात

CD

सासवड, ता. ४ : सासवड (ता. पुरंदर) येथील कऱ्हा व चरणावती नदीच्या संगमावरील पुरातन श्री संगमेश्वर मंदिर परिसरात सध्या जलपर्णी व कचरा साठल्याने ऐतिहासिक सौंदर्याला बाधा निर्माण झाली आहे. सासवडचे येथील साहित्यसम्राट आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या ‘कऱ्हेचे पाणी’ या आत्मचरित्राच्या मुखपृष्ठावर या मंदिराचे छायाचित्र असल्याने या ठिकाणाला वेगळे महत्त्व आहे.
​दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेला या परिसरात हजारो पणत्या लावून भव्य दीपोत्सव साजरा केला जातो. त्यावेळी बंधाऱ्यातील पाण्यात मंदिर आणि दिव्यांचे नयनरम्य प्रतिबिंब पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करतात.​ तसेच, मंदिरात दररोज शिवभक्त, अभ्यासासाठी विद्यार्थी, मंदिराचे स्थापत्य पाहण्यासाठी तज्ज्ञ, छायाचित्रकार, चित्रकार येत असतात. अनेक मराठी चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले आहे. श्रावण महिन्यात येथे मोठी गर्दी असते. मात्र, आता वाढलेली जलपर्णी, दूषित पाणी आणि कचरा यामुळे परिसरात दुर्गंधी पसरण्याचा धोका आहे.
​संगमेश्वर सुधार समितीने नगरपरिषद प्रशासनाकडे संगमेश्वर मंदिर ते संत सोपानकाका महाराज समाधी मंदिर परिसरातील जलपर्णी काढण्याबाबत वारंवार विनंती करूनही त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. नगरपरिषदेने या परिसरात दगडी घाट बांधला आहे. मात्र, स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. तसेच, गणेश विसर्जनावेळी शेकडो मूर्ती व निर्माल्य येथे टाकले जाते. याबाबतही जनजागृती होणे आवश्यक आहे.
चित्रपट कला दिग्दर्शक संदीप इनामके यांनी या ऐतिहासिक ठेव्याची जपणूक करण्यासाठी पालिका, नागरिक, मंदिराचे मालक, सुधारणा समिती व सामाजिक संस्थांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

सासवड नगरपरिषदेचा स्वच्छता सर्वेक्षण अभियानात सातत्याने नंबर येतो, तसे प्रत्यक्षात कामही झाले पाहिजे, सिनेमासारखे नको. पालिकेने दरवर्षी किंवा वर्षाआड जलपर्णी काढली पाहिजे. यासाठी सामाजिक संस्था आणि नागरिकांनी हातभार लावला पाहिजे. नदीपात्रात सांडपाणी, कचरा आणि मेलेली जनावरे टाकू नयेत. यासाठी संरक्षकाची नेमणूक करणे महत्त्वाचे आहे. उत्सवापुरते नको तर लोकसहभागातून कायमस्वरूपी स्वच्छता झाली पाहिजे. भविष्यात पर्यटनस्थळाच्या दृष्टीने याकडे पाहून हा ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे.
- संदीप इनामके, चित्रपट कला दिग्दर्शक

05962

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

State Government : मंत्रिमंडळाचा निर्णयांचा धडाका; निवडणूक आचारसंहितेपूर्वी घेतले २१ निर्णय

Maharashtra Governance : कायद्याबाहेरील कलमांवर दिला हद्दपारीचा आदेश; विभागीय आयुक्तांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय केला रद्द!

Sakal Karandak : पुणे विभागातून ‘बीएमसीसी’ महाअंतिम फेरीत सकाळ करंडक; विभागीय अंतिम फेरीचा समारोप

PMC elections : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल; ६ ऐवजी १४ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर होणार!

ODI Record: भारतीय वंशाच्या क्रिकेटरचा अमेरिकेसाठी पराक्रम; विराटलाही मागे टाकत वनडेमध्ये रचला विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT