सासवड, ता. २८ : येथील ग्रामीण रुग्णालयात ‘जीभ बांधणे’ अर्थात ‘टंग टाय’ या दुर्मिळ समस्येवर सुमारे १९ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन अकमार यांनी दिली आहे.
केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला असून यामुळे गरजू बालकांना वेळेत आणि मोफत उपचार मिळण्यास मदत झाली आहे. आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ येम्पल्ले, आणि जिल्हा रुग्णालय मेडिकल ऑफिसर डॉ. वंदना जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली, दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गुजर, शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. अर्चना झेंडे, तसेच यवत ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शस्त्रक्रिया शिबिरात सक्रिय सहभाग घेतला. सासवड ग्रामीण रुग्णालयातील अन्य डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांचेही या उपक्रमासाठी सहकार्य केल्याचे डॉ. अकमार यांनी सांगितले.
या यशस्वी उपक्रमामुळे टंग टाय असलेल्या १९ बालकांना बोलणे आणि अन्न ग्रहण करण्यातील अडचणींवर मात करण्यास मदत मिळणार असून, सासवड ग्रामीण रुग्णालयाच्या सेवेत एक नवा आणि महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे.
- डॉ. गजानन अकमार, वैद्यकीय अधीक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.