पुणे

सासवडमध्ये पोलिसांचे संचलन

CD

​सासवड, ता. २९ : सासवड नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सासवड पोलिस ठाण्याच्या वतीने शनिवारी (ता. २९) रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते.
​निवडणुकीच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ करण्यासाठी आणि पोलिस दलाची सज्जता दर्शविण्यासाठी संचलन करण्यात आले. या संचलनामध्ये एसआरपीएफ गट एक व दोन, पुणे येथील एक अधिकारी आणि ३५ कर्मचाऱ्यांसह पोलिस निरीक्षक, तीन सहाय्यक उपनिरीक्षक तसेच १२ अंमलदार, असे एकूण ५० पेक्षा अधिक जवान सहभागी झाले होते. सायंकाळी सासवड पोलिस ठाण्यापासून सुरू झालेला हा रूट मार्च जयप्रकाश चौक, अमर चौक, चांदणी चौक, बादशाही मशीद, बहिरम पुरा चौक, नेताजी चौक यासह शहरातील प्रमुख आणि संवेदनशील मार्गांवरून फिरला. पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च शांततेत पार पडला.


6065

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लांच्या थेट डोक्याला लावली बंदूक, Z+ सुरक्षा असतानाही घटना; २० वर्षांपासून रचत होता कट

Pune News: नागपूर खंडपीठाचा निर्णय! आरटीई प्रवेशातील अंतराची अट स्थगित; पालकांना पुन्हा अर्ज करण्याची संधी, काय आहे आदेश..

Harish Rana : इंजिनिअर होण्याचं स्वप्न अपुरं… १३ वर्षे कोमात झुंजलेल्या मुलाला इच्छामरण; वडिलांच्या डोळ्यांत अश्रू, शब्दही थरथरले…

Latest Marathi News Live Update : देशभरात गॅस सिलिंडर टंचाईमुळे लोकांची धावाधाव सुरूच

30-Year Journey of Homemade Spice Business: कांडप यंत्रातून उभा राहिला स्वादाचा प्रवास; परळीच्या जाधव मसाल्याची ३० वर्षांची परंपरा

SCROLL FOR NEXT