सासवड, ता. ३ : सासवड नगरपरिषदेच्या निवडणुकीत मोठ्या उत्साहात मतदान झाले असले, तरी मतदार याद्यांतील गोंधळ आणि प्रशासकीय त्रुटींमुळे मतदारांना त्रास सहन करावा लागला.
निवडणूक प्रक्रियेत मतदार याद्या अद्ययावत नसल्याने आणि त्या अक्षरांच्या क्रमानुसार लावल्यामुळे गोंधळ वाढला. त्यामुळे एकाच घरातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर विखुरली गेली. यामुळे मतदारांना आपले केंद्र शोधण्यात वेळ वाया गेला. तसेच, मतदानाच्या स्लिप्सही व्यवस्थित वाटण्यात न आल्याने मतदारांना थेट याद्यांमध्ये नावे शोधावी लागली.
अध्यक्षपदासाठी एक आणि नगरसेवकपदाच्या दोन उमेदवारांना मतदान करण्याची व्यवस्था एकाच यंत्रावर होती आणि मतदारांना एकूण तीन बटणे दाबणे आवश्यक होते. ही प्रक्रिया समजून घेण्यात मतदारांना अडचणी आल्या. त्यामुळे मतदान केंद्रावरील अधिकाऱ्याला प्रत्येक वेळी सूचना द्यावी लागली आणि प्रक्रियेत वेळ गेला. त्यामुळे निवडणूक यंत्रणेच्या पूर्वतयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
प्रत्येक प्रभागाच्या मतदार यादीत मयत आणि दुबार काहीची, तर तीन ते चार वेळा नावे होती. त्यामुळे मतदार याद्यांची अचूकता आणि ईपीआयसीला आधार लिंक करण्याची प्रक्रिया राबवण्याची गरज असल्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.