पुणे

‘​पुरंदरमध्ये फासेपारधी समाज मूलभूत सुविधांपासून वंचित’

CD

सासवड, ता. २ : पुरंदर तालुक्यातील भटक्या व विमुक्त जमातीतील फासेपारधी समाज आजही मूलभूत हक्क आणि सुविधांपासून वंचित असून, त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. अठरापगड बारा बलुतेदार सोशल फाउंडेशनचे तालुका उपाध्यक्ष अनिकेत नितीन काळे यांनी यासंदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
‘‘तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी पुरंदर यांना निवेदन दिले आहे. स्वातंत्र्याच्या अनेक दशकांनंतरही या समाजाचे अपेक्षित पुनर्वसन झालेले नाही. ३० ते ५० वर्षांपासून एकाच ठिकाणी वास्तव्यास असूनही अनेक कुटुंबांकडे जातीचा दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड किंवा रहिवासी दाखला यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे नाहीत. यामुळे हा समाज शासकीय योजनांपासून पूर्णपणे तुटलेला आहे,’’ असे काळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
तालुक्यातील वस्त्यांवर आजही नागरिक पाल, झोपड्या किंवा पत्र्याच्या शेडमध्ये राहत असून वीज, पाणी आणि स्वच्छतागृहांचा मोठा अभाव आहे. कागदपत्रांअभावी मुले शाळाबाह्य राहत असून शिष्यवृत्ती आणि वसतिगृह सुविधांपासून वंचित आहेत. आरोग्य केंद्रांची अनुपलब्धता आणि कौशल्याच्या अभावामुळे बेरोजगारी व उपासमारीचे संकट कायम आहे, यासाठी शासकीय दाखल्यांसाठी गावोगावी विशेष शिबिरे आयोजित करावीत. तसेच, प्रधानमंत्री, रमाई व शबरी आवास योजनेंतर्गत या समाजाला हक्काची घरे मिळवून द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे. शासनाने केवळ फाइलवर लक्ष न देता प्रत्यक्ष वस्त्यांवर जाऊन परिस्थितीची पाहणी करावी, अशा मागण्या काळे यांनी निवेदनातून केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran War Ceasefire Talks : मोठी बातमी ! इराण युद्धबंदीच्या चर्चेसाठी तयार पण... डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितला नेमका अडथळा काय?

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! फेब्रुवारी अन् मार्चचा हप्ता एकाच वेळी मिळणार, तारीखही आली समोर...

Hadapsar Station: हडपसर स्थानकात चौथ्या फलाटाला मंजुरी; प्रवाशांची सोय, विस्तार झाल्याने रेल्वे गाड्यांची संख्या वाढणार

Heart & Kidney Disease Detection Tool: मधुमेहामुळे हार्ट आणि किडनीवर येणारा ताण आता आधीच ओळखता येणार; डॉक्टरांसाठी नवीन स्मार्ट टूल लाँच!

Summer Travel 2026: यंदा उन्हाळी पर्यटनाला महागाईच्या झळा; विमान कंपन्यांकडून भाडेवाढ शक्य, आधीच बुकिंगचा तज्ज्ञांकडून सल्ला

SCROLL FOR NEXT