पुणे

बोपदेव घाट आजपासून सात दिवस बंद

CD

सासवड, ता. ७ : सासवड आणि पुणे शहराला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असलेल्या बोपदेव घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. घाटात सुरू असलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या आणि विस्तारीकरणाच्या कामामुळे हा मार्ग गुरुवारपासून (ता. ८) ते बुधवारपर्यंत (ता. १४) या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने घेतला आहे.
बोपदेव घाटामध्ये सध्या रस्त्याचे महत्त्वपूर्ण काम सुरू आहे. कामाचा दर्जा आणि सुरक्षितता राखण्यासाठी प्रशासनाने हा मार्ग आठवडाभर बंद ठेवण्याचे निश्चित केले आहे. विशेष म्हणजे, या कालावधीत एकेरी वाहतुकही सुरू राहणार नाही, त्यामुळे वाहनचालकांनी या मार्गाकडे न वळण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे.
​बोपदेव घाट हा केवळ सासवड- कोंढवा प्रवाशांसाठीच नाही, तर पुरंदरसह अनेक तालुक्यांसाठी महत्त्वाचा दुवा आहे. मात्र, प्रवाशांनी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. बोपदेव घाट बंद असल्यामुळे प्रवाशांनी दिवे घाट, नारायणपूर मार्गे चिव्हेवाडी घाटाचा वापर करावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभाग हवेली दोनचे शाखा अभियंता देवेन मोरे केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! सलग तिसऱ्या दिवशी सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा ताजा भाव

T20 WC: वानखेडे स्टेडियमवर शांतता ठेवू... भारताविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी इंग्लंडच्या स्टार खेळाडूची वॉर्निंग

'बिग बॉसमध्ये गेल्यामुळे मेंदूला किडे लागले...' उषा नाडकर्णी म्हणाल्या...'मला त्यावेळी खूप त्रास...'

Latest Marathi News Live Update : दुबईत अडकलेल्या पुणेकरांची माहिती राज्य सरकारकडून संकलित

Sangli Agents Stuck : इस्रायल–इराण संघर्षाच्या छायेत सांगलीतील १० विमा प्रतिनिधी दुबईत अडकले; एअर इंडियाचे उड्डाण रद्द

SCROLL FOR NEXT