पुणे

पुरंदर- हवेलीच्या विकासाचा ध्यास घेतलेले बहुआयामी नेतृत्व

CD

इतिहासाची पाने उलटली की पुरंदरचा भक्कम गड, वज्रगड आणि सासवडची पावन भूमी डोळ्यासमोर उभी राहते. जेजुरीचा खंडोबा, नारायणपूरचे दत्त महाराज आणि सासवडचे संत सोपानकाका यांची ही तपोभूमी! याच मातीत छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला आणि आचार्य अत्रेंसारखे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडले. अशा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुरंदर तालुक्यात १५ जानेवारी १९७६ रोजी एका झंझावाती नेतृत्वाचा जन्म झाला, ते नाव म्हणजे संजय चंद्रकांत जगताप.

- अनिल महादेव उरवणे, सर व्यवस्थापक, पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था सासवड व माजी अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ पुरंदर

लोकनेते स्व. चंदुकाका जगताप यांनी स्वतः कमी शिक्षण घेऊनही आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याचा विडा उचलला. संजय जगताप यांचे प्राथमिक शिक्षण सासवडच्या पुरंदर हायस्कूलमध्ये झाले, तर माध्यमिक शिक्षणासाठी ते पाचगणीच्या संजीवन विद्यालयात गेले. त्यांचे थोरले बंधू राजेंद्र (बापू) अभ्यासात कुशाग्र होते, त्यांनी पुढे IAS होऊन केंद्र सरकारच्या संरक्षण खात्यात मोलाची जबाबदारी सांभाळली. संजय जगताप यांनी MBA (Finance) पूर्ण केले. शिक्षणासोबतच त्यांना समाजकार्याची आणि जनसंघटनाची उपजतच आवड होती.

​सहकार आणि बँकिंग क्षेत्रातील क्रांती
​वडिलांचा समाजकारणाचा वारसा पुढे नेत संजय जगताप यांनी सन १९९५मध्ये ‘गुरुदत्त स्वयं सहाय्यता बचत गट’ स्थापन केला. १९९७ मध्ये त्यांनी पुरंदरची अर्थवाहिनी मानल्या जाणाऱ्या ‘संत सोपानकाका सहकारी बँके’ची धुरा अध्यक्ष म्हणून स्वीकारली.
​प्रगतीचा टप्पा : संत सोपानकाका सहकारी बँकेच्या १८ शाखा असून ६२५ कोटींच्या ठेवींचा टप्पा पार केला आहे. ​आर्थिक शिस्त: बँकेचा निव्वळ नफा ३ कोटी ७३ लाख असून ३७५ कोटींचे कर्ज व्यवहार यशस्वीपणे सुरू आहेत. सर्वसामान्यांचा आधार : ज्यांना कोणीही कर्ज देत नव्हते, अशा बेरोजगार तरुणांना, शेतमजुरांना आणि लघुउद्योजकांना आधार देऊन संजय सरांनी ९० टक्के समाजकारण आणि १० टक्के राजकारण हे ब्रीद सार्थ ठरवले.

शेती आणि दूध प्रक्रियेतून समृद्धी
​शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी ‘पुरंदर मिल्क अँड ऍग्रो प्रॉडक्ट लिमिटेड’ची (खळद) स्थापना केली. दरवर्षी सभासदांना दिवाळीला तुपाचे वाटप करण्याची परंपरा त्यांनी जपली आहे. खते, बी-बियाणे पुरवण्यापासून ते कोल्ड स्टोअरेज उभारणीपर्यंत त्यांनी शेतकऱ्यांना सक्षम केले. ​पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेच्या माध्यमातून २५० कोटींहून अधिक ठेवी आणि ११ हजारांहून अधिक सभासदांचे आर्थिक जाळे विणले आहे.

​शिक्षण आणि सांस्कृतिक चळवळ
​श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी खेड्यापाड्यात २७ विद्यालये उभी केली. शिक्षणासोबतच सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी ''सासवड सांस्कृतिक मंडळ'' स्थापन केले. वक्तृत्व, भजन, बुद्धिबळ आणि कबड्डी अशा विविध स्पर्धांच्या माध्यमातून तरुणांच्या गुणांना वाव दिला. ‘शिवाजी व्यायाम मंडळा’च्या माध्यमातून ‘पुरंदर केसरी’ कुस्ती स्पर्धा भरवून १३ मल्लांना तयार केले. तालुक्यातील मल्ल ‘महाराष्ट्र केसरी’ व्हावा, हे त्यांचे स्वप्न आहे. सन २००२पासून क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना ‘पुरंदर भूषण’ आणि ‘सोपानकाका भक्ती’ पुरस्काराने सन्मानित करण्याची परंपरा त्यांनी सुरू केली.

​महिला सक्षमीकरण आणि आरोग्य सेवा
​सौ. राजवर्धीनी संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली १२,४०० महिलांना ‘ग्रामीण आरोग्य स्मार्ट कार्ड’ वाटप करण्यात आले. या माध्यमातून ग्रामीण महिलांना मोफत आरोग्य सुविधा दिल्या जात आहेत. इंदिरा महिला नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून महिला बचत गटांना आर्थिक बळ देण्याचे काम सातत्याने सुरू आहे.

​सासवडचा कायापालट
स्वच्छता आणि विकास : ​संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली सासवड नगरपालिकेने स्वच्छतेमध्ये राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर
प्रथम क्रमांक पटकावला. ५८ कोटींची भुयारी गटार योजना आणि घरकुल योजनेच्या माध्यमातून त्यांनी सासवडचा चेहरामोहरा बदलून टाकला.

​संकटकाळातील श्रावण बाळ
​कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये १७,९०० लोकांना सलग ५२ दिवस (९ लाख १५ हजार थाळ्या) मोफत भोजन घरपोच दिले. १९ हजार कुटुंबांना किराणा आणि हजारो लिटर सॅनिटायझरचे वाटप केले. ​रक्तदान : आरोग्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन १०,००० पिशव्या रक्त संकलित करण्याचा ऐतिहासिक विक्रम केला. पूरग्रस्त मदत : कोल्हापूर-सांगलीच्या पूरग्रस्तांना १ लाख भाकरी आणि मदतीचे ७ ट्रक पाठवून माणुसकीचे दर्शन घडवले.

कर्तृत्वाचा ठसा उमटवला
जनतेने त्यांना सन २०१९ मध्ये ३२,००० मतांच्या प्रचंड बहुमताने विधानसभेत पाठवले. आमदार म्हणून काम करताना त्यांनी विकासाचा जो आलेख मांडला, तो वाखाणण्याजोगा आहे. दापोली येथील बेलोसे एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्षपद असो वा पुरंदर-हवेलीचे नेतृत्व, संजय जगताप यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. अशा या लोकनेत्यास वाढदिवसानिमित्त आणि पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Visa Suspend: अमेरिकेचा मोठा निर्णय! रशिया, इराणसह ७५ देशांसाठी व्हिसा प्रक्रिया थांबवली; भारत आणि पाकिस्तानचं काय? जाणून घ्या...

IND vs NZ, 2nd ODI: भारतावर पराभवाची संक्रांत! डॅरिल मिशेलचं शतक, विल यंगनेही दिली भक्कम साथ; न्यूझीलंडचा दणदणीत विजय

सोलापूर महापालिका निवडणूक! ३५०० पोलिसांचा ४८ तास खडा पहारा; क्युआरटी, आरसीपी, एसआरपीएफच्याही तुकड्या; शहरात ४६ ठिकाणी फिक्स पॉइंट

Latest Marathi News Live Update : निवडणुकीत कुणालाही पाठिंबा नाही - मनोज जरांगे

SSC and HSC Exam Centers: मोठी बातमी! दहावी-बारावीच्या 107 परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द; पाहा संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT