पुणे

सासवडच्या ग्रामदैवताचे उत्तर भारत यात्रेसाठी प्रस्थान

CD


सासवड, ता. १६ : सासवडचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराजांच्या उत्सव मूर्तींचे बारा ज्योतिर्लिंग व उत्तर भारत तीर्थयात्रेसाठी शुक्रवारी (ता.१६) मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले. दरवर्षीप्रमाणे आयोजित केल्या जाणाऱ्या या यात्रेच्या निमित्ताने सासवड शहरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले.
​यानिमित्त उत्सवमूर्तींची मिरवणूक पालखी रथातून ट्रस्टचे अध्यक्ष रमेश जगताप व माजी उपनगराध्यक्ष संदीप जगताप यांच्या बैलजोडीच्या साहाय्याने काळभैरवनाथ मंदिरापासून मुख्य बाजारपेठेतून मार्गस्थ होत शिवतीर्थापर्यंत काढण्यात आली. यावेळी ‘नाथ साहेबांचे चांगभलं’च्या जयघोषाने आणि बाँडच्या सुरावटीने परिसर दुमदुमून गेला होता. याप्रसंगी श्री काळभैरवनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष रमेश जगताप, उपाध्यक्ष पांडुरंग भोंगळे, चैत्री उत्सव समितीचे अध्यक्ष रवींद्र क्षीरसागर, गावपाटील संग्राम जगताप, नगरपरिषदेचे गटनेते अजित जगताप, रवींद्रपंत जगताप, रामचंद्र इनामके, जयसिंग जगताप, दामोदर जगताप, विजय जगताप, रमेश जगताप, तानाजी काकडे, संजय वढणे, प्रवीण टिळेकर, ओंकार पवार, आशुतोष जगताप यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. ही यात्रा सासवड येथून सुरू होऊन वणी सप्तशृंगी गड, गिरनार, सोरटी सोमनाथ, द्वारका, अमृतसर, वाघा बॉर्डर, वैष्णोदेवी, कुरुक्षेत्र, जयपूर, खाटूश्याम आणि उज्जैन अशा प्रमुख तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेऊन १५ दिवसांनी सासवडमध्ये परतणार आहे. श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टने या उपक्रमाचे नियोजन केले असून, सासवड परिसरातील ५० पेक्षा अधिक भाविक या यात्रेत सहभागी झाले आहेत.

6284

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti Conversion: मोठी बातमी! महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायद्याला मंजुरी; सक्तीचे धर्मांतर आणि लव्ह जिहादवर लगाम लागणार

Latest Marathi News Live Update :मध्य रेल्वे मुंबई विभागात विनातिकीट प्रवास करणाऱ्या १६.१६ लाख प्रवाशांकडून १.३१ कोटी रुपये दंड वसूल बंधनकारक

Nashik Water Pipeline : पंचवटीत खासगी कंपनीचा आडमुठेपणा! मुख्य पाईपलाईन फोडली, होळीच्या सणाला नागरिकांचे हाल

Teacher Mobile Ban : अध्यापनावेळी शिक्षकांच्या मोबाईल वापरास निर्बंध; हेरवाडमधील कन्या शाळेच्या व्यवस्थापन समितीचा निर्णय, मोबाईल जमा करण्याचे बंधन

Thane News: मुंबई-ठाणे-कल्याण प्रवास सुसाट होणार! खाली रस्ता, मध्यभागी उड्डाणपूल आणि वर मेट्रो धावणार, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

SCROLL FOR NEXT