पुणे

सासवडवसीयांकडे सव्वादोन कोटींची थकबाकी

CD

सासवड, ता. १६ : सासवड नगर परिषद प्रशासनाने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी कर वसुलीची मोहीम अधिक तीव्र केली आहे. ज्या मिळकतधारकांकडे मालमत्ता कर थकीत आहे, त्यांनी ३० जानेवारी २०२६ पर्यंत कराचा भरणा न केल्यास जप्ती, नळ जोड तोडणे आणि मालमत्ता सील करणे यासारखी कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नगर परिषदेकडे सुमारे २ कोटी १५ लाख रुपये शास्ती (दंड) स्वरूपात थकीत आहेत. थकीत मिळकतधारकांसाठी शासनाने ‘अभय योजना’ सुरू केली असून, या योजनेअंतर्गत मूळ कराचा पूर्ण भरणा करणाऱ्या नागरिकांना शास्तीमध्ये अंशतः किंवा पूर्णतः सवलत मिळणार आहे. ही संधी गमावू नये, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी दिला आहे.
मुदतीत कर न भरल्यास नगरपरिषद अधिनियम १९६५ नुसार ​मालमत्ता सील करणे किंवा जप्त करणे, जप्त केलेल्या मालमत्तेची विक्री करणे, नळ जोड खंडित करणे, जमीन महसूल संहितेनुसार इतर मिळकतींवर बोजा चढवणे, महत्त्वाच्या चौकांमध्ये फ्लेक्स लावून थकबाकीदारांची नावे जाहीर करणे., याप्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी डॉ. चव्हाण यांनी सांगितले. तसेच शहराच्या विकासासाठी कर महसूल अत्यंत महत्त्वाचा आहे. या निधीतूनच नागरी सुविधांची कामे केली जातात. त्यामुळे नागरिकांनी कारवाईची वेळ येऊ न देता, आपली थकबाकी भरून नगर परिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. चव्हाण यांनी केले आहे.

ऑनलाइन सुविधा
​नागरिकांच्या सोयीसाठी कर भरणा करण्याकरिता नगरपरिषदेत रोख रक्कम, क्यूआर कोड, आरटीजीएस अथवा एनईएफटी तसेच www.saswadnagarparishad.org या संकेतस्थळावर ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

स्टार प्रवाहवरील अभिनेत्रीची झी मराठीच्या 'सनई चौघडे' मध्ये एंट्री; पहिल्यांदा साकारणार आईची भूमिका

Pre Sleep Habits: दिवसभराचा थकवा आणि चिडचिड घालवायची असेल, तर झोपण्यापूर्वी 'या' गोष्टींना करा कायमचा टाटा!

Latest Marathi News Live Update: ५०० चौरस फुटापर्यंतच्या सदनिकेचा करमाफीचा प्रस्ताव फेटाळला

LPG Gas: उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आलोय, मला सिलिंडर द्या...; अधिकारी असल्याचे भासवले; एजन्सीमधून सिलिंडर घेऊन पळून गेले

SCROLL FOR NEXT