सासवड, ता. २२: ‘बजाज पुणे ग्रँड टूर-२०२६’ चा तिसऱ्या टप्प्याचा प्रारंभ गुरुवारी (ता. २२) दुपारी साडेबारा वाजता सासवड (ता.पुरंदर) येथील शिवतीर्थावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सायकल स्पर्धेला झेंडा दाखवून झाला.
ढोलताश्यांचा गजर, छत्रपती शिवराय आणि भारत मातेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. सासवडमधील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेषभूषेमध्ये सादर केलेली नृत्ये, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि जल्लोष महत्त्वाचे ठरले.
यावेळी खासदार सुनेत्रा पवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, आमदार विजय शिवतारे, माजी आमदार संजय जगताप, पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल्ल, नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप आदी उपस्थित होते.
स्पर्धेचा तिसरा टप्पा पुरंदर आणि बारामती तालुक्यातून सुमारे १३४ किलोमीटरचा आहे. सासवडहून सुरू झालेली ही शर्यत खुर्द, पानवडी, काळदरी खोरे, मांढर, माहूर, परिंचे, वाल्हे आणि नीरा मार्गे पुढे बारामतीकडे गेली. पानवडी व काळदरी परिसरातील डोंगरदऱ्यांचा घाटमार्ग आणि निसर्गसौंदर्याने नटलेल्या या भागात सायकलपटूंचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
नागरिकांच्या प्रतिसादामुळे खेळाडूंना प्रोत्साहन आणि आनंद मिळतो. काही स्पर्धकांशी चर्चा केली असता त्यांनी सर्व व्यवस्था उत्तम, रस्ते चांगले आणि नागरिकांचा प्रतिसाद पाहून आनंद मिळाल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच बजाज, सिरम अशा अनेक कंपन्यांचे सहकार्य यामागे आहे. सासवडकरांचे विशेष कौतुक आहे; त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे स्पर्धकांना खऱ्या अर्थाने हुरूप मिळाला.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
सायकल स्पर्धेमुळे रस्ते खड्डेमुक्त, परिसर फलकमुक्त आणि स्वच्छ झाला आहे. ही परिस्थिती आषाढ वारी किंवा अभियानांपुरती मर्यादित न राहता, नेहमीच राहिली पाहिजे. शहर स्वच्छ ठेवणे ही केवळ प्रशासनाचीच नाही तर नागरिकांचीही जबाबदारी आहे. या मोहिमेमुळे सासवड शहर फलकमुक्त झाले. पोलिस ठाण्यासमोरील वर्षानुवर्षे पडून असलेली अपघातग्रस्त वाहने हटविल्याने रस्त्यानेही ‘मोकळा श्वास’ घेतला आहे.
- संदीप इनामके, चित्रपट कला दिग्दर्शक
06313,
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.