पुणे

सासवडच्या महाविद्यालयात डिजिटल मार्केटिंग कार्यशाळा

CD

सासवड, ता. १० : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघिरे महाविद्यालयातील वाणिज्य व संशोधन विभागामार्फत ‘माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील करिअर संधी’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत १४५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
​या कार्यशाळेत मेराकी ट्रेनिंग सेंटरचे ऋषिकेश शिंदे आणि किरण दातार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आजच्या स्पर्धात्मक युगात डिजिटल मार्केटिंगमध्ये नोकरी आणि व्यवसायाच्या प्रचंड संधी असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी केवळ पदवीवर अवलंबून न राहता कौशल्य विकास, तांत्रिक ज्ञान आणि आत्मविश्वासाच्या जोरावर या क्षेत्रात यश मिळवावे, असे आवाहन त्यांनी केले.
महाविद्यालयाने मेराकी ट्रेनिंग सेंटरसोबत सामंजस्य करार केला असून, त्याद्वारे भविष्यात प्लेसमेंट आणि उद्योजकता विकासासाठी विविध उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती डॉ. बी. एल. शिंदे यांनी दिली. प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य विभागाने कार्यशाळेचे आयोजन केले. उपप्राचार्य डॉ. संजय झगडे, डॉ. बी. यु. माने, डॉ. बी. एल. शिंदे, समन्वयक डॉ. नरसिंग गिरी आणि विभागप्रमुख डॉ. किशोर लिपारे यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Iran Policy : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का ! अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्ध युद्ध थांबवण्याचा प्रस्ताव मंजूर

दिग्गज क्रिकेटपटूचे वाढदिवशीच निधन... होणाऱ्या पत्नीच्या निधनाची बातमी कळूनही संघासाठी उतरले होते मैदानात

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे नालासोपारा पूर्वेतील तुळींज पोलीस ठाण्यातही पाणी साचले

Climate Change Health Impact: हवामान बदलाचा आरोग्याला फटका! ताप, सर्दी-खोकला आणि श्वसनविकारांच्या रुग्णांत मोठी वाढ

4 वर्षांचा प्रवास थांबणार, स्टार प्रवाहवरील 'ही' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, मुख्य नायिकेची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT