पुणे

सासवडच्या ‘शिवसृष्टी’त शिवभक्तांची गर्दी

CD

सासवड, ता. १९ : शिवजयंतीनिमित्त सासवड (ता. पुरंदर) नगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या ‘शिवसृष्टी’ या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयातील ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन पाहण्यासाठी शिवभक्तांनी गर्दी केली होती.
नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, नगरसेविका प्रियांका जगताप, लीना वढणे, स्मिता सुहास जगताप, अर्चना जगताप, शीतल भोंडे, स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप यांसह अनेक मान्यवर, नागरीक, तरुण आणि लहान मुलांनी शिवसृष्टी व ऐतिहासिक वस्तू प्रदर्शनाचा लाभ घेतला.
माजी आमदार संजय जगताप यांच्या संकल्पनेतून या शिवसृष्टीची उभारणी झाली आहे. या वास्तूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सोहळा, शिवमंदिर, राज्याभिषेक सोहळा, सिंहासनावरील पूर्णाकृती पुतळा, राजमुद्रा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील विविध देखाव्यांची चित्रणे, शिवकालीन शस्त्रांचे पत्र तसेच दूरचित्रांची उभारणी करण्यात आली आहे.
दरम्यान, सध्या अंथरुणावर खिळून असलेले येथील ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते शरद ख्रिस्ती यांच्या कुटुंबीयांना शिवजयंतीनिमित्त स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप यांच्या वतीने किराणा किट देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasai Vasai News : वसईत सीरियल शूटिंग सेटला आग, स्टुडिओचे मोठे नुकसान

Beed: कार्डियक रुग्णवाहिका पोहचली थेट पोलीस ठाण्यात; डॉक्टरची मोठी चूक? अपघातातल्या रुग्णाचा मृत्यू

Sakal Book Festival : खरा आनंद पुस्तक वाचनातूनच, मान्यवरांचे मत; सकाळ पुस्तक महोत्सवाचे शानदार उद्घाटन

Students Overdose Incident : गोळ्यांचा ओव्हरडोज; शिक्षक, मुख्याध्यापक निलंबित; जिल्हा परिषद शाळेतील प्रकार

Mumbai: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंचा मनसेला जोरदार धक्का; मुंबईच्या राजकारणात नवा ट्विस्ट!

SCROLL FOR NEXT