पुणे

हातपंप कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी शासनाकडे साकडे

CD

​सासवड, ता. २२ : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीपुरवठा सेवा देणाऱ्या हातपंप देखभाल व दुरुस्ती कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ''हातपंप देखभाल व दुरुस्ती कर्मचारी संघटने''ने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सासवड येथे जिल्हाध्यक्ष नारायण सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांना ई-मेलद्वारे पाठवण्यात आले.
​यावेळी कामगार नेते ज्ञानोबा घोणे, मोहनराव चव्हाण उपस्थित होते. अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेऊन जिल्हा परिषदेप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी, भविष्य निर्वाह निधी योजनेची अंमलबजावणी करावी, दरमहा पे-स्लिप मिळावी आणि १५ लाख रुपयांचा विमा उतरवावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. ​या मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना साकडे घालण्यात आले असून, लवकरच मंत्रालयात शिष्टमंडळ भेटणार आहे. बैठकीला महादेव जाधव, विशाल काळे, दिनेश पवार, कैलास सुर्वे, समीर सुतार यांच्यासह विविध तालुक्यातील कर्मचारी उपस्थित होते.

6449

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT