पुणे

‘पुरंदर उपसा’चे पाणी ठरतेय विषारी

CD

सासवड, ता. २५ : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागासाठी वरदान ठरलेली पुरंदर उपसा जलसिंचन योजना आता नागरिकांच्या आरोग्यासाठी चिंतेचा विषय बनली आहे. योजनेद्वारे येणाऱ्या पुणे शहराच्या सांडपाण्यामुळे आणि रसायनांमुळे लाभक्षेत्रातील ओढे, तलाव आणि जमिनीतील पाण्याचे स्रोत मोठ्या प्रमाणावर दूषित झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरींपासून ते सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरींपर्यंत सर्वच पाणी पिण्यायोग्य राहिले नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पुरंदर उपसा योजनेचे पाणी केवळ शेतीसाठी आहे. मात्र, हे पाणी सातत्याने ओढे आणि तलावात साठत असल्याने पाझराद्वारे जमिनीतील पाण्याचे साठेही दूषित झाले आहेत. याचा सर्वाधिक फटका मानवी आरोग्याला आणि पशुधनाला बसत आहे. दूषित पाण्यामुळे परिसरातील नागरिकांसह लहान मुलांनाही मुतखडा, पोटाचे गंभीर विकार आणि त्वचारोगांचे प्रमाण वाढले आहे. याबरोबरच डायलिसिस आणि कॅन्सरच्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याचे चित्र आहे. दुभत्या जनावरांच्या प्रजनन क्षमता आणि दूध उत्पादनावरही परिणाम होत असून, जनावरांमध्ये पोटाच्या विकारांसह अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे.
उन्हाळा सुरू होताच पिण्याच्या पाणीटंचाईच्या झळा तीव्र होणार आहेत. गावागावांत यात्रांचा हंगाम सुरू होत असतानाच दरवर्षीप्रमाणे पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी या परिसरातील गावांमध्ये नागरिक १० ते ४० रुपये मोजून २० लिटरचा जार विकत घेत आहेत. मात्र, या खासगी जारमधील पाणी खरोखर शुद्ध आहे का, याची कोणतीही हमी नाही.
​या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रगत देशांप्रमाणे सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याचे तंत्रज्ञान वापरणे आवश्यक आहे. याबाबत वाघापूर, चौफुला येथे काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांशी झालेल्या संवाद बैठकीत जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुणे, पिंपरी चिंचवड व नदीकाठावरील कारखाने, ग्रामपंचायतींना जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले आहे.

पुरंदर उपसा योजनेच्या खराब पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित झाले आहेत. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच व्याधीग्रस्त झाले आहेत. अनेकांना कर्करोगासारखे भयंकर आजार जडले आहेत. त्यामुळे प्राधान्याने योजनेवरच जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याची आवश्यकता आहे.
- माऊली यादव, पंचायत समिती सदस्य

06461

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cloudy Weather Impact on Grapes : द्राक्ष उत्पादकांनो सावधान! व्यापाऱ्यांच्या 'या' जाळ्यात अडकू नका; पावसाच्या नावाखाली दराची मोठी लूट? तज्ज्ञांनी काय दिला सल्ला?

Apps Ban India : भारताने 'या' 5 OTT प्लॅटफॉर्मवर घातली बंदी! तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर लगेच करा डिलीट, नाहीतर होईल कारवाई

Ranji Trophy Final मध्ये मोठा राडा! जम्मू-काश्मीरचा कर्णधार कर्नाटकच्या फिल्डरला भिडला, मग मयंक अगरवालही...

३० हजारांची लाच घेतली अन् फसला, उपसंचालकाकडे ४ कोटींची रोकड, कोट्यवधींचं सोन् आणि अनेक ठिकाणी फ्लॅट; ट्रॉली बॅगेत पैसे

Sensitive Teeth Tips: दात संवेदनशील आहेत? गरम किंवा थंड खाल्ल्यावर झिणझिण्या येतात? हे 3 टिप्स आजच फॉलो करा

SCROLL FOR NEXT