पुणे

सासवडमध्ये २८ दुचाकीस्वारांवर कारवाईचा बडगा

CD

सासवड, ता. २५ : रस्त्यावरून जाताना सायलेन्सरचा मोठा आवाज काढून नागरिकांना त्रास देणाऱ्या २८ दुचाकीस्वारांवर सासवड पोलिसांनी कारवाई केली आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर राबवलेल्या विशेष मोहिमेत आरटीओमार्फत या वाहनांना एकूण तीन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. यावेळी सायलेन्सरमध्ये बदल करून कर्कश आवाज काढणाऱ्या बुलेट, स्प्लेंडर, पल्सरसह २८ वाहनांवर कारवाई करण्यात आली. या जप्त वाहनांची बुधवारी (ता. २५) आरटीओ अधिकाऱ्यांनी तपासणी करून दंड आकारला. विशेष म्हणजे, जप्त केलेल्या गाड्यांमध्ये सहा वर्षांपूर्वी बारामतीतून चोरीला गेलेली एक बुलेटही पोलिसांना सापडली आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अप्पर अधीक्षक गणेश बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक वैभव सोनवणे व पथकाने ही कारवाई केली. बेशिस्त दुचाकीस्वारांवरील या धडक कारवाईमुळे सासवडकरांनी समाधान व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: भाडेकरूंना मोठा दिलासा! मालमत्तेचा हिस्सा घेतल्यास घरातून बेदखल करता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबईच्या खेळाडूंना मिळणार वार्षिक करार! पण रोहित शर्मा, शिवम दुबे, सर्फराज खान अपात्र; MCA कडून वर्षाला किती लाख होते मिळणार?

Jalgaon Heatwave : जळगाव जिल्‍ह्यात उष्णतेची लाट कायम! उन्‍हाच्‍या तीव्र झळा; जिल्‍ह्यातील सर्वच शहरांतील तापमान ४२ अंशांवर

Delhi Airport: दिल्ली विमानतळावर थरारक क्षण! दोन विमानांच्या पंख्याची धडक, काही सेकंदांत वाचले शेकडो जीव

भारतातील नवीन ग्रॅज्युएट्ससाठी AI स्पेशलिस्ट' अन् 'कंटेंट क्रिएटर' ठरतायेत टॉप करिअर ट्रेंड्स! LinkedIn ‘Grads Guide 2026’ अहवाल

SCROLL FOR NEXT