पुणे

​सासवडमध्ये कर्तृत्ववान महिलांचा गौरव

CD

सासवड, ता. १० : ‘‘कुटुंबाच्या पाठिंब्याशिवाय महिला प्रगती करू शकत नाही. स्त्री आणि पुरुष ही संसाराची दोन चाके आहेत, ती सोबत चालली तरच समाजाचा खऱ्या अर्थाने विकास होईल. एकमेकांबद्दल आदर बाळगणे ही काळाची गरज असून, कौटुंबिक वादात सामंजस्य ठेवल्यास अनेक प्रश्न सुटू शकतात,’’ असे प्रतिपादन पुरंदरच्या गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त सासवड पोलिस आणि शहर पत्रकार संघ यांच्या वतीने आयोजित ‘महिला सन्मान’ कार्यक्रमात श्रीश्रीमाळ बोलत होत्या. सासवड पोलिस ठाण्यात पार पडलेल्या कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक कुमार कदम आणि पोलिस उपनिरीक्षक अर्चना पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाच महिलांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र आणि साडी-चोळी देऊन गौरविण्यात आले. यामध्ये सासवड एसटी स्थानक परिसरात सातत्याने स्वच्छतेचे काम करणाऱ्या छाया सुभाष पवार, शेती सांभाळून आपल्या दोन्ही मुलांना पोलिस दलात भरती केल्याबद्दल उदाचीवाडीच्या वैशाली तानाजी हगवणे, संगीत क्षेत्रात विशेष योगदान दिल्याबद्दल सुवर्णा भगवान होले (नाळे), पतीच्या निधनानंतर प्रतिकूल परिस्थितीत आपल्या चार मुलांना उच्चशिक्षित केल्याबद्दल परवीन मुसाभाई बागवान आणि सासवड पोलिस ठाण्यामध्ये वाहन चालक म्हणून उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या रूपाली गंगाधर पुंडगे (वाढवे) यांचा समावेश होता.
याप्रसंगी ज्येष्ठ समाजवादी नेते रावसाहेब पवार, ॲड. कला फडतरे, प्राचार्य इस्माईल सय्यद, संतोष ए. जगताप, नगरसेवक ज्ञानेश्वर गिरमे, मोहन चव्हाण आदी उपस्थित होते. सुधीर गुरव, गणेश मुळीक, जीवन कड, राजेंद्र बर्गे, गौरव कोलते, नितीन यादव, तानाजी सातव, शकील बागवान, जगदीश शिंदे, संदीप जगताप, गोपनीय विभागाचे रूपेश भगत व सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
बाळासाहेब कुलकर्णी यांनी प्रास्ताविक, तर पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत ताकवले यांनी सूत्रसंचालन केले. किशोरी अतुल पवार यांनी सन्मानपत्रांचे वाचन केले, तर संभाजी महामुनी यांनी आभार मानले.

06533

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Update: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT