सासवड, ता. ११ : युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन आणि गॅस पुरवठ्याबाबत पसरणाऱ्या अफवांना रोखण्यासाठी पुरंदर प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध वापर, साठेबाजी किंवा काळाबाजार करणाऱ्यांविरोधात आता थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा तहसीलदार विक्रम राजपूत यांनी दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी विशेष धडक मोहीम राबविण्यात येत आहे. घरगुती गॅसचा हॉटेल, ढाबे किंवा उद्योगांमध्ये बेकायदेशीर वापर होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत प्रशासनाने भरारी पथके स्थापन केली आहेत. ही पथके अचानक तपासणी करणार असून, दोषी आढळल्यास कडक कायदेशीर कारवाईसह सिलिंडर जप्तीची प्रक्रिया राबवली जाईल., असेही तहसीलदार विक्रम राजपूत यांनी सांगितले.
गॅस एजन्सीने वितरणात पारदर्शकता ठेवावी. ग्राहकांकडून जादा रक्कम घेणे किंवा कृत्रिम टंचाई निर्माण करणे असे प्रकार आढळल्यास गय केली जाणार नाही. शासनाच्या प्राधान्य क्रमानुसारच वितरण करणे बंधनकारक असल्याचे तहसीलदार म्हणाले. तसेच कोणत्याही हॉटेल किंवा उद्योगांनी घरगुती सिलेंडरचा वापर करू नये. उल्लंघन केल्यास प्रचलित नियमानुसार थेट गुन्हे दाखल केले जातील., असे राजपूत यांनी स्पष्ट केले. तालुक्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा नियमित सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये आणि गॅस एजन्सीवर गर्दी करू नये, असे आवाहनही तहसीलदारांनी केले आहे.
सर्वसामान्य नागरिकांना गॅस पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी महसूल विभाग सतर्क आहे. कुठेही अवैध वापर किंवा नफेखोरी आढळल्यास नागरिकांनी प्रशासनाला माहिती द्यावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
- विक्रम राजपूत, तहसीलदार, पुरंदर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.