पुणे

सासवडमध्ये सकाळ पुस्तक महोत्सवास प्रारंभ

CD

सासवड, ता. २० : वाचनसंस्कृतीला बळ देण्यासाठी सासवडमध्ये (ता. पुरंदर) आयोजित ‘सकाळ प्रकाशन’ पुस्तक महोत्सवाचे उद्‍घाटन शुक्रवारी (ता. २०) उत्साहात करण्यात आले. नगरपरिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलन्स येथे सुरू झालेल्या या महोत्सवाला पहिल्याच दिवशी वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, महाराष्ट्र साहित्य परिषद सासवड शाखेचे अध्यक्ष ॲड. दिलीप निरगुडे आणि आरोग्य समितीचे सभापती राजन जगताप यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‍घाटन करण्यात आले. हा महोत्सव २२ मार्चपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी खुला राहणार आहे.
उद्‍घाटनप्रसंगी अनिल गद्रे, रवींद्रपंत जगताप, हेमंत ताकवले, तानाजी सातव, शरद पाडसे, जगदीश शिंदे, सुदेश राऊत, पायल राऊत आदी उपस्थित होते. या महोत्सवात विविध विषयांवरील दर्जेदार पुस्तके उपलब्ध असून सासवडकरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
साहित्य परिषदेचे ॲड. दिलीप निरगुडे यांनी, सकाळ माध्यमाने सासवडसारख्या ठिकाणी या महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या, तर हेमंत ताकवले यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले.
महोत्सवात श्री. एम यांचे ‘योगी शिष्याचे आत्मकथन’, डॉ. सदानंद मोरे यांचे साहित्य, डॉ. बालाजी तांबे यांचे आरोग्यविषयक ग्रंथ आणि स्वामी विवेकानंदांचे विचार, अशा वैविध्यपूर्ण पुस्तकांचे दालन खुले झाले आहे. विशेषतः बालसाहित्य आणि उद्योजकता या विषयांवरील पुस्तकांना युवा वर्गाची पसंती मिळत आहे. महोत्सवाचे नियोजन अनिकेत बिराडे करीत आहेत.

वाचकांसाठी खास सवलत
प्रत्येक पुस्तकावर १० टक्के सुट, एक हजार रुपयांच्यावर खरेदी केल्यास २५ टक्के सूट.​ ग्रंथालये आणि संस्थांसाठी ३० टक्के पर्यंत विशेष सवलत.

06581

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: रुपाली चाकणकरांना राजीनामा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश; आजच निर्णय? सूत्रांची माहिती

Thane News: ठाणेकरांसाठी मोठी बातमी! २३ मार्चपासून २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार; पण कधीपर्यंत आणि कुठे? जाणून घ्या यादी...

US-Iran War : अमेरिका इराणमध्ये पाठवणार २५०० सैनिक, होर्मूज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी नवा प्लॅन

Diesel Price: मोठा झटका! पेट्रोलनंतर डिझेलही महागलं; तब्बल २२ रुपयांनी वाढ, जाणून घ्या नवे दर...

Unseasonal Rain Hits KedarKheda Region : केदारखेडा परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा; गहू-हरभरा-ज्वारी पिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT