सासवड, ता. १३ : सासवड (ता. पुरंदर) परिसरातील रस्त्यालगतच्या असुरक्षित विहिरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सासवड - नारायणपूर मार्गावर कळमेश्वर घाटाजवळ असलेली उघडी विहीर धोकादायक ठरत आहे. प्रशासनाने व संबंधित मालकाने याकडे वेळीच लक्ष न दिल्यास अपघात होण्याची शक्यता आहे.
सासवड- नारायणपूर रस्त्यावरील कळमेश्वर घाट, दशक्रिया विधीच्या ठिकाणाजवळ कऱ्हा नदीपात्रालगत आणि बंधाऱ्याच्या खाली विहीर आहे. या विहिरीला कोणतेही संरक्षक कठडे, भिंती, झाकण किंवा जाळी बसवण्यात आलेली नाही. ही विहीर पूर्णपणे उघड्या स्वरूपात असून, रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी धोक्याची शक्यता आहे.
पूर्वीचे अपघात
कमळेश्वर येथील विहिरीजवळ मागील वर्षी नारायणपूरहून सासवडकडे येणारी एक भरधाव मोटार रस्त्याचा कठडा आणि सौर दिव्याच्या खांबाला धडकून थेट विहिरीच्या तोंडापाशी येऊन थांबली होती. सुदैवाने मोटार विहिरीत कोसळली नाही, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला होता.
अपघातानंतर उपाययोजना
पालखी महामार्गालगत सासवड हद्दीतील एका विहिरीचे उदाहरण सकारात्मक आहे. तीन वर्षांपूर्वी जेजुरीहून देवदर्शन करून परतणारी रिक्षा या विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला होता. यावेळी महामार्गाचे काम सुरू होते. या दुर्घटनेनंतर विहीर मालकाने तातडीने दखल घेत रस्त्याच्या बाजूने १० ते १२ फुटांचा उंच आरसीसी संरक्षक कठडा बांधला आहे. तसेच, रात्रीच्या वेळी वाहनचालकांना विहीर लांबूनच दिसावी, यासाठी परावर्तक व्यवस्थाही केली आहे.
संरक्षणात्मक उपाययोजनांचा अभाव
चेतावणी फलक नाही
परावर्तक नाही
उंच कठडे नाहीत
संरक्षण जाळी नाही
या उपाययोजनांची मागणी
विहिरींचे सर्वेक्षण करण्याची गरज
जाळी बसवणे किंवा भराव टाकावे
उंच कठडे उभरावे
सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या संरक्षक भिंत, जाळी अशा उपाययोजना करणार आहे.
- राजेंद्र टकले, विहीर मालक
संबंधित विहीर मालकांना सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याबाबत सूचना केली जाईल. प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याबाबत अंमलबजावणी करू.
- ओंकार रेळेकर, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
06695
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.