पुणे

खासगी तलावात पोहण्याचा सासवडकरांचा भर

CD

जीवन कड : सकाळ वृत्तसेवा
​सासवड, ता. २३ : उन्हाळ्याची चाहूल लागताच शालेय मुलांना सुट्ट्यांचे वेध लागले आहेत. कडक उन्हात मुले तसेच तरुणांचा ओढा नैसर्गिकरित्या पोहण्याकडे असतो. सासवड नगरपरिषद क्षेत्रात कार्यान्वित असलेल्या खासगी जलतरण तलावात सासवडकर पोहण्याचा आनंद घेत आहेत.

सासवड शहरात नगरपरिषदेचा स्वतःचा कोणताही जलतरण तलाव उपलब्ध नाही. मात्र, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेचा श्री शिवाजी जलतरण तलाव शहराच्या क्रीडा क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या तलावाचे व्यवस्थापन सध्या एचटूओ स्विमर्स क्लब संस्थेच्या माध्यमातून ठेवले जात आहे.

तलावासाठी शुद्ध आणि स्वच्छ पाण्याचा वापर केला जातो. विहिरीचे आणि विंधन विहिरीचे पाणी टँकरद्वारे आणून ते फिल्टर प्रक्रियेनंतर तलावात सोडले जाते. दरम्यान, स्पर्धेच्या दृष्टीनेही प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध असल्याचे एचटूओ स्विमर्स क्लबचे व्यवस्थापक विनायक देसाई यांनी सांगितले.

२....... पोहायला शिकणाऱ्या मुलांसाठी प्रशिक्षकांची नियुक्ती
३..... जीवरक्षक
१५० ......दररोज पोहणारे मुले, महिला आणि नागरिक

दृष्टिक्षेपात तलाव
लाइफ जॅकेट
बचावासाठी स्टिक
मुले आणि महिलांसाठी स्वतंत्र बॅच

तलावातील सुविधा
पाठदुखी, मणक्याच्या आजारावर उपाय
गुडघेदुखी, टाचदुखी, वजन कमी करण्यासाठी पाण्यात चालण्याची सुविधा

आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही लहान मुले, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक विकासासाठी हा तलाव सुस्थितीत ठेवला आहे. पाण्याचे शुद्धीकरण आणि मुलांची सुरक्षा याला सर्वोच्च प्राधान्य असते.
- विनायक देसाई, व्यवस्थापक


मुलांच्या उन्हाळी सुट्ट्यांसाठी तसेच नागरिकांनाही दररोजच्या व्यायामासाठी जलतरण तलाव हा उत्तम पर्याय आहे. मी दररोज मुलासह पोहायला येतो. येथे चांगले प्रशिक्षक आणि सुविधा आहेत. शहराची वाढती लोकसंख्या पाहता, सासवड नगरपरिषदेने पुणे महानगरपालिकेप्रमाणे अद्यावत स्वतःचा प्रशस्त आणि सुसज्ज जलतरण तलाव उभारण्याची आवश्यकता आहे.
- संतोष ए. जगताप, नागरिक, सासवड (ता.पुरंदर)


06738

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway Protest : "जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची", शक्तिपीठ महामार्गाविरोधात हजारो शेतकरी रस्त्यावर

PoK Violence : पाकव्याप्त काश्मीरमध्ये रक्तरंजित संघर्ष! निदर्शकांवर गोळीबार, १२० जण ठार झाल्याचा दावा; तणाव वाढला, नेमकं काय घडलं?

FIFA World Cup 2026 full Schedule: ४८ संघ, ३९ दिवस अन् १०४ सामन्यांचा थरार रंगणार..! कुठे पाहाणार सामने? जाणून घ्या सर्वकाही

Dharavi Redevelopment: धारावीचा विकास सिंगापूर-हाँगकाँगच्या धर्तीवर, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं प्रकल्प कधी पूर्ण होणार?

राज्यसभेच्या २६ जागांसाठी २८ उमेदवार मैदानात, भाजपनं वाढवलं काँग्रेसचं टेन्शन; दोन-तृतियांश बहुमतासाठी NDAच्या हालचाली

SCROLL FOR NEXT