सासवड, ता. २६ : पुरंदरच्या लाल मातीचे भूषण ठरलेल्या आणि कुस्तीशौकिनांचे लक्ष लागून राहिलेल्या ‘पुरंदर केसरी’ कुस्ती स्पर्धेचे रविवारी (ता.२६) सासवड येथील काळभैरवनाथ कुस्ती आखाड्यात उत्साहात उद्घाटन झाले. पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने, पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था आणि पुरंदर तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
सहकारमहर्षी स्वर्गीय चंदुकाका जगताप यांच्या स्मरणार्थ आणि माजी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सलग २० वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. नंदकुमार जगताप, मार्तंड भोंडे, मनोहर जगताप, अजित जगताप, माऊली गिरमे, सोपान रणपिसे, यांसह कुस्तीगीर संघाचे सदस्य आणि मान्यवरांच्या हस्ते महाबली हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यानंतर चांदीची गदा आणि आखाडा पूजन करून स्पर्धेला सुरुवात झाली.
आंतरराष्ट्रीय पंच रोहिदास आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पंचांचे पथक काम पाहत आहे.
06754
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.