पुणे

चोरीच्या घटना अनेक, तक्रारी मात्र दोनच

CD

सासवड, ता. ७ : पुरंदर तालुक्यातील सासवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभरापासून कृषी पंपाच्या केबल आणि विद्युत पंप चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. वर्षभरात अनेक घटना घडूनही प्रत्यक्षात पोलिस ठाण्यात केवळ दोनच तक्रारींची नोंद झाली आहे.
चोरीच्या दाखल तक्रारींमध्ये माहूर आणि वनपुरी येथील घटना आहेत. माहूर येथे एका कंपनीच्या शेडमधून एक लाख रुपये किमतीचे पाच अश्वशक्तीचे चार पंप, २० हजार रुपयांची कॉपर वायर आणि सुमारे ९० हजार रुपयांच्या वेल्डिंग मशीनवर चोरांनी डल्ला मारला. तसेच, शेजारील शेतकऱ्याची १६ हजार रुपयांची विंधन विहिरीतील पंप आणि केबलही लंपास केली. वनपुरी येथेही १४ हजार २०० रुपयांचे तीन अश्वशक्तीचा पंप आणि केबल चोरीला गेली आहे. केवळ या दोन- तीन घटनांमधील नुकसानीचा आकडा २ लाख ४० हजार रुपयांच्या घरात आहे. मात्र, अनेक शेतकरी पोलिस तक्रार करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याने चोरीचा एकूण आकडा यापेक्षा मोठा असण्याची शक्यता आहे.

महावितरणकडून शेतकऱ्यांना पंपाच्या स्टार्टरपर्यंत विद्युत पुरवठा आणि मीटरची व्यवस्था करून दिली जाते. एकदा ही जोडणी पूर्ण झाली की, त्यापुढील केबल किंवा पंपाची सुरक्षितता ही संबंधित ग्राहकाची जबाबदारी असते. त्यामुळे चोरीच्या घटनांमध्ये आमचा तांत्रिकदृष्ट्या सहभाग राहत नाही.
- गणेश चांदणे, उपकार्यकारी अभियंता, सासवड

शेतकरी आधीच निसर्गाचा लहरीपणा, बाजारभाव आणि खतांच्या वाढत्या दरामुळे संकटात आहे. १००- १२५ फूट केबल चोरीला गेली तरी कामाचा मोठा खोळंबा होतो. तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्याचे हेलपाटे मारायला आमच्याकडे वेळ नाही. त्यामुळे आता आम्हीच उपाययोजना म्हणून स्टार्टरपासून पंपापर्यंतची केबल पाइपमधून जमिनीखाली खोल गाडून नेण्याचा प्रयोग करत आहोत, जेणेकरून चोरांना केबल कापता येणार नाही.
- संतोष जगताप, शेतकरी, सासवड.

सासवड पोलिस ठाणे हद्दीत कृषी पंपांच्या चोरीबाबत तक्रारींची दखल घेत आहे. दाखल गुन्ह्यांचा तपास सध्या सुरू आहे. ग्रामीण भागात रात्रीची गस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या असून, शेतकऱ्यांनीही संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.
- कुमार कदम, पोलिस निरीक्षक, सासवड.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार? तारखेबाबत महत्त्वाची अपडेट समोर...

Pimpri Chinchwad fire: पिंपरी-चिंचवड हादरले! भंगार गोदामातील भीषण आगीने परिसर धुराने व्यापला, ६० जवानांची शर्थ

Fifa World Cup 2026 : ९० मिनिटं, पुतळ्यासारखा उभा राहतो हा माणूस; कोण आहे Michel Nkuka Mboladinga? तो असं का करतो? Video

Kolhapur Water Lifting Ban : कोल्हापूर, सांगलीतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! 'या' नद्यांवरील पाणी उपसाबंदी अखेर शिथिल; जलसंपदा विभागाचा आदेश जारी

Tutari Express: तुतारीचं इंजिन बिघडलं, आधीच ४ तास उशिरा त्यात आणखी २ तास विलंब; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT