पुणे

तक्रारवाडी टोल नाक्यावर वसुली थांबविण्याची मागणी

CD

सासवड, ता. ७ : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाचे काम अपूर्ण असतानाच तक्रारवाडी (ता. पुरंदर) टोल नाक्यावर वसुली सुरू झाल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. नियमबाह्य वसुली तातडीने थांबवून स्थानिकांना पूर्ण माफी द्यावी, या मागणीसाठी शिवसैनिकांनी टोल व्यवस्थापकांना निवेदन देत जोरदार निदर्शने केली.
पुरंदर तालुक्यातील सर्व खासगी, व्यावसायिक व शेतीपूरक वाहनांना टोलमधून पूर्ण सूट मिळावी. सेवा रस्ते, दिशादर्शक फलक आणि वृक्षारोपणासारखी कामे पूर्ण होण्यापूर्वीच वसुली सुरू करणे, हा कायदेशीर दरोडा आहे. ई-वाहने, महिला चालक, दिव्यांग आणि आजी-माजी सैनिकांना नियमानुसार सवलत द्यावी. वारी कालावधीत वारकऱ्यांच्या वाहनांना महिनाभर माफी द्यावी. टोल नाक्यावर पिण्याचे पाणी, शौचालय आणि टोईंग व्हॅनची माहिती देणारे फलक लावण्याची मागणी करण्यात आली.
​या आंदोलनात तालुकाप्रमुख अभिजीत जगताप, संतोष भोसले, राजाभाऊ क्षीरसागर, राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal political violence: बंगालचं खुनी राजकारण! विरोधकांच्या मुलांचं रक्त आईला खायला लावलं होतं... सर्वात भयानक हत्याकांड...

PSI Success Story: जिद्द, चिकाटी आणि संघर्षाची कहाणी, अपयशानंतरही न हार मानता गणेश आढावचा प्रेरणादायी PSI पदापर्यंत प्रवास!

ChatGPT अन् Google Gemini च्या नावाखाली मोठा Scam! युजर्सच्या अकाऊंटमधून आपोआप कट होत आहेत पैसे; नेमकं प्रकरण काय?

Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’ला एक वर्ष! भारताच्या ‘या’ घातक शस्त्रांसमोर पाकिस्तान गुडघ्यावर; चिनी हत्यारं कशी पडली निष्प्रभ?

Mumbai: आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थानकात धूर, भुयारी मेट्राेचा खाेळंबा; दाेन तास प्रवाशांची गैरसोय

SCROLL FOR NEXT