पुणे

विमानतळ भूसंपादनासाठी मोबदला वाटपाला सुरुवात

CD

​सासवड, ता. ७ : पुरंदर तालुक्यातील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला आता गती प्राप्त झाली आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रियेनंतर गुरुवारी (ता. ७) प्रत्यक्ष मोबदला वाटपाला सुरुवात झाली. उदाचीवाडी येथील एका शेतकऱ्याने आपल्या एक एकर जमिनीचा ताबा प्रशासनाकडे सोपवला असून, त्याच्या बँक खात्यात जमिनीचा मोबदला आरटीजीएसद्वारे जमा करण्यात आला आहे.
​भूसंपादन अधिकारी कल्याण पांढरे यांनी गुरूवारी रात्री पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी भूसंपादन अधिकारी संगीता चौगुले याही उपस्थिती होती.
संबंधित शेतकऱ्याने आपल्या एक एकर जमिनीसाठी प्रशासनाकडे संमती दर्शविली. संमती करारनामा झाला. भूसंपादन अधिकाऱ्यांनी सर्व कायदेशीर बाबी तपासून संमती करारनामाचा निवाडा करीत करारनाम्यावर शिक्कामोर्तब केले. ही प्रक्रिया पूर्ण होताच राष्ट्रीयीकृत बँक खात्यावर एक कोटी ७९ लाख रुपये आरटीजीएसद्वारे जमा करण्यात आले.
या प्रकल्पात अल्पभूधारक, भूमिहीन, बेघर आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या हिताला आमचे सर्वोच्च प्राधान्य असेल. पारदर्शक पद्धतीने आणि संमतीने ही प्रक्रिया पार पाडली जात आहे,’’ असे कल्याण पांढरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Update: भीषण घटना! क्रिकेटच्या मैदानावर वीज कोसळली; एका खेळाडूचा मृत्यू, अनेक जखमी, मान्सूनचा कहर

Pune Bus Accident : इलेक्ट्रिक 'शिवाई' बसची अनेक गाड्यांना धडक, घटनास्थळावरचा VIDEO आला समोर

देऊळ बंद २ ने राजा शिवाजी सिनेमाचाही रेकॉर्ड मोडला, आतापर्यंत कमावले तब्बल इतके कोटी

Thane News: अंबरनाथ शिवमंदिर परिसरातील आरक्षणाविरोधात विहिंप-बजरंग दल आक्रमक, बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा

Latest Marathi News Live Update : भारत-इस्रायल संरक्षण सहकार्याला नवी गती; राजनाथ सिंह-आमीर बाराम यांची भेट

SCROLL FOR NEXT