पुणे

मावळातील राजकीय समीकरणे बदलली

CD

तळेगाव दाभाडे, ता. ३ ः मावळ तालुक्यात गेल्या दहा वर्षांत अनेक निवडणुकांत भाजप पराभूत झाले. त्यानंतर नेतेमंडळींनी आत्मचिंतन करत नवी रणनीती आखण्यास सुरुवात केली. त्याची फळे आता सहकारी संस्थांच्या निवडणुकांत मिळू लागली आहे. अनेक निवडणुकांत भाजप समर्थक पॅनेल आणि उमेदवारांना यश मिळाल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये लक्षणीय बदल होऊ लागले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसची पिछेहाट होत आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोणावळा व तळेगाव दाभाडे नगरपरिषद, तसेच वडगाव व देहू नगरपंचायतींमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर भाजपने सहकार क्षेत्राकडे लक्ष केंद्रित केले. पवना कृषक सहकारी संस्था, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघ आणि खादी ग्रामोद्योग संस्थांच्या निवडणुकांत भाजप समर्थक गटांना चांगले यश मिळाले. काही ठिकाणी राष्ट्रवादीचे पारंपरिक वर्चस्व कायम राहिले तरी अनेक संस्थांमध्ये भाजपने धूर्त रणनीतीवर समीकरणे बदलली.

भाजपची रणनीती
विशेषतः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १३ सदस्य आणि भाजपचे केवळ पाच सदस्य असतानाही सभापतीपदी भाजपचे सुभाष जाधव विजयी झाले. या निवडीत भाजपने आखलेली रणनीती निर्णायक ठरल्याचे बोलले जात आहे. काही संस्थांमध्ये बिनविरोध निवडी घडवून आणण्यातही भाजप समर्थक गटांना यश आले.
मावळ तालुक्यातील सहकार क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक वर्षांचे वर्चस्व असतानाही बदलत्या राजकीय परिस्थितीत भाजपने मजबूत घुसखोरी केली आहे. आगामी काळात सहकार क्षेत्रातील हे बदल तालुक्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारे ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भयंकर! ४८७ हून अधिक पुरुषांसोबत शरीरसंबंधासाठी दबाव, सिगारेटचे चटके, मारहाण अन्... प्रियकराचं प्रेयसीसोबत पाशवी कृत्य

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरात ६० लाखांहून अधिक किमतीचा गोवंश जप्त; १३१ गोवंशांची सुटका, ८ आरोपींवर ४ गुन्हे दाखल

SRH vs RR Eliminator IPL 2026: वैभव सूर्यवंशीचे वादळ पाहून काव्या मारनच्या चेहऱ्याचा रंग उडालेला... Boss Baby बाद होताच कशी होती तिची रिअ‍ॅक्शन ते पाहा... Video Viral

Koregaon Park Raid : पुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! वेश्याव्यवसाय करणाऱ्या केनियाच्या 4 तरुणींची सुटका; कोरेगाव पार्क हादरलं

Fuel Price Hike: इंधनाचे दर पुन्हा वाढले! बुधवारी मध्यरात्रीपासून नवीन दरवाढ लागू; पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT