पुणे

तळेगाव ढमढेरे येथे शेतकऱ्यांचा मोर्चा

CD

तळेगाव ढमढेरे, ता.१५ : तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील महावितरणच्या कार्यालयावर शेतीपंपाची तोडलेली वीज पुन्हा जोडावी या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी नुकताच मोर्चा काढला. यावेळी कार्यालयावर शांततेत मोर्चा काढण्यात आला व महावितरणचे कनिष्ठ अभियंता दादा बारवकर यांना निवेदन देण्यात आले.
तळेगाव ढमढेरे परिसरातील शेतकऱ्यांनी गहू, ज्वारी, हरभरा, कांदा, ऊस आदी पिके घेतली असून, थकीत वीज बिल भरावे या कारणासाठी महावितरणने शेतीपंपाची वीज तोडली आहे, त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. शेतीपंपाची तोडलेली वीज त्वरित जोडावी यासाठी गावातील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन मोर्चाचे नियोजन केले होते.
हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास वीज तोडल्यामुळे हातातून निसटण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहे. यामुळे शेतीपंपाची वीज त्वरित जोडावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल, तसेच शेतकऱ्यांनी शेतीपंपाचे चालू बिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन बारवकर यांनी निवेदन स्वीकारताना दिले.


04368

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Peace Deal Update: इराणचा अमेरिकेसोबत शांतता करार, पण इस्रायलची भूमिका काय?; पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया आली समोर

Omkareshwar Temple: ब्लड डोनेट करा अन् मोफत VIP दर्शन घ्या! ओंकारेश्वर मंदिराची भन्नाट ऑफर; भक्तांची गर्दी, ब्लड बँकही झाली फुल

Khadakwasala Dam Water : खडकवासला धरणातून ११६ दिवसांत १०.३४ टीएमसी पाण्याचा विसर्ग; १३ जूनपासून कालव्याचा विसर्ग बंद

Latest Marathi News Live Update : भाजप शहराध्यक्षांनी चालवली बस, भितींला धडक

गुंगीचं औषध देत अत्याचार, नंतर व्हिडिओ काढला अन्...; वर्गमित्राने तरुणीचा घात केला, भयंकर घटनेतील मौलवी फरार

SCROLL FOR NEXT