पुणे

निमगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी दादाभाऊ रणसिंग

CD

तळेगाव ढमढेरे, ता. २३ : निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी दादाभाऊ रामदास रणसिंग आणि उपाध्यक्षपदी अनिल दादाभाऊ तागड यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. एस. कुंभार व सचिव दिलीप पुणेकर यांनी कामकाज पाहिले.
या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक ग्रामस्थांच्या सहकार्याने बिनविरोध झाली.
अध्यक्षपदासाठी दादाभाऊ रणसिंग आणि उपाध्यक्षपदासाठी अनिल तागड यांचा एकमेव अर्ज आल्याने दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

यावेळी विशाल नागवडे, जयराम चव्हाण, दादाभाऊ काळे, भगवान चव्हाण, सचिन नागवडे, रोहिदास रणसिंग, गहीना चौधरी, बाबा रणसिंग, विठ्ठल पवार, जयश्री रणसिंग, शुभांगी चव्हाण आदी उपस्थित होते.
संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष दादाभाऊ रणसिंग आणि उपाध्यक्ष अनिल तागड यांचा ग्रामस्थांतर्फे सत्कार केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT