पुणे

‘नदीपात्रातील पाणी संपल्यानंतर बंधाऱ्यांची दुरुस्ती करावी’

CD

तळेगाव ढमढेरे, ता.१० : पाटबंधारे विभागामार्फत भीमा नदीच्या पात्रातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. याबाबत सध्या उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई असून, बंधाऱ्याची दुरुस्ती नदीपात्रातील पाणी संपल्यानंतर करावी आणि पाणीटंचाई दूर करण्यासाठी योग्य नियोजन करावे, अशी मागणी शिरूर तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र ढमढेरे यांनी कोंढापुरी पाटबंधारे शाखेचे शाखा अधिकारी रा.मा.आहेर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वढू, पेरणे, बुर्केगाव, सांगवी सांडस येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने १५ एप्रिल २०२३ नंतर सदर बंधारे पाणी सोडून रिकामे करण्यात येणार आहेत. फक्त नदीपात्राबरोबर पाणी ठेवण्यात येणार आहे. संबंधित गावच्या सरपंच व ग्रामसेवकांनी आपल्या स्तरावर भीमा नदीच्या दोन्ही तीरावरील खासगी जलउपसा पंपधारक शेतकऱ्यांना कळवून पाण्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन करावे, असे शिक्रापूर येथील कोंढापुरी पाटबंधारे शाखेचे शाखा अधिकारी आहेर यांनी पत्राद्वारे ग्रामपंचायतींना कळविले होते.
याबाबत शेतकरी संघटनेतर्फे आहेर यांना निवदेन देऊन बंधाऱ्याची दुरुस्ती नदीपात्रातील पाणी संपल्यानंतर करावी, अशी मागणी केली. निवेदनात म्हटले की, सध्या उन्हाळ्यामुळे भीमा नदीपात्रात पाणी सोडले आहे. शेती व पिण्यासाठी हे पाणी उपयुक्त ठरत आहे. तसेच या बंधाऱ्यावरील पाण्यावर नदीकाठच्या अनेक गावच्या पाणी योजना अवलंबून आहेत. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या खासगी व सार्वजनिक उपसा जलसिंचन योजना आहेत. शेती व पिण्यासाठी नदीपात्रातील पाण्याची नितांत गरज आहे. नदीपात्रातील हे पाणी सोडून दिले, तर बंधारे कोरडे पडून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होईल. बंधारे दुरुस्त झाल्यानंतर पुढील पाण्याचे आवर्तन केव्हा येईल याची शाश्वती नाही. तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता नदीपात्रातील पाणी संपल्यानंतर बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी आग्रही मागणी शेतकरी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT