पुणे

दोन उपसरपंच नियुक्तीसाठी तरतूद करण्याची मागणी

CD

तळेगाव ढमढेरे, ता. ८ : महाराष्ट्रात सध्या दोन उपमुख्यमंत्री आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही दोन उपसरपंच असावेत अशा प्रकारची तरतूद करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी पुणे आणि पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतच्या सरपंच अंकिता भुजबळ व उपसरपंच राहुल भुजबळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यासंदर्भात तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत सदस्य व बाजार समितीचे माजी उपसभापती अनिल भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या दोन उपमुख्यमंत्री असून, तशाच प्रकारची दोन उपसरपंच पदाची तरतूद स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये (ग्रामपंचायत) करावी, अशा तरतुदीचा सकारात्मक अभिप्राय आम्हाला कळवावा असे म्हटले आहे. गावातही अनेक गट असतात, त्या गटापैकीच अनेक जण ग्रामपंचायत सदस्य झालेले असतात. ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर प्रत्येकालाच पद मिळावे, अशी अपेक्षा असते. त्यातच सरपंचपद राखीव असले तर इतरांना संधी मिळत नाही. दोन उपसरपंच करण्याची तरतूद केली तर सर्वांनाच पाच वर्षाच्या कालावधीत उपसरपंच पदाची संधी मिळेल असेही अनिल भुजबळ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bus Accident : इलेक्ट्रिक 'शिवाई' बसची अनेक गाड्यांना धडक, घटनास्थळावरचा VIDEO आला समोर

देऊळ बंद २ ने राजा शिवाजी सिनेमाचाही रेकॉर्ड मोडला, आतापर्यंत कमावले तब्बल इतके कोटी

Thane News: अंबरनाथ शिवमंदिर परिसरातील आरक्षणाविरोधात विहिंप-बजरंग दल आक्रमक, बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा

Latest Marathi News Live Update : तमिळनाडूतील कारखान्यात गॅस गळतीमुळे मृत्यू झालेले पाचही जण ओडिशामधील; मृतदेह परत आणण्याचे प्रयत्न सुरू

Keir Starmer: मोठी बातमी! अखेर ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचा राजीनामा; नव्या PM च्या शर्यतीत मोठं नाव आघाडीवर

SCROLL FOR NEXT