पुणे

तळेगाव ढमढेरेत दीड एकर उसाला आग

CD

तळेगाव ढमढेरे, ता. २ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) भोसेवस्ती येथील शेतकरी प्रदीपकुमार ऊर्फ संदीप बाळासाहेब ढमढेरे यांच्या शेतातील दीड एकर उसाला बुधवारी (ता. १) आग लागून उसाचे नुकसान झाले आहे. शेतातील विजेच्या तारांमुळे शॉर्टसर्किट होऊन उसाला आग लागल्याचे ढमढेरे यांनी सांगितले.
परिसरातील शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, तळेगाव ढमढेरे परिसरात उष्णतेची तीव्रता जास्त असल्यामुळे आग आटोक्यात आली नाही. आगीत ऊस जळून खाक झाला असून, तलाठी व महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी संदीप ढमढेरे यांनी केली आहे. दरम्यान, शेताच्या कडेला विद्युत खांब वाकलेला असल्यामुळे शेतात विद्युत तारा लोंबकळत आहेत. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन उसाला आग लागली आहे. वाकलेला विजेचा खांब त्वरित दुरुस्त करावा व तारांना ताण द्यावा, अशी मागणी ढमढेरे यांनी केली आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) ः भोसेवस्ती येथील आगीत जळालेला ऊस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik UPSC Exam: दोन मिनिटे उशीर अन् UPSC परीक्षा हातातून गेली! नाशिकमध्ये विद्यार्थी-पालक आक्रमक! खड्डे, पाऊस, ट्रॅफिकचा फटका

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे जाण्याच्या घोषणेनंतर नांदेडमधील मराठा बांधव सज्ज

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

SCROLL FOR NEXT