पुणे

तळेगाव येथील १२ केंद्रांवर ८० अधिकाऱ्यांची नियुक्ती

CD

तळेगाव ढमढेरे, ता.१३ : तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील एकूण १२ मतदान केंद्रावर निवडणूक आयोग व प्रशासनाकडून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दोन्ही इमारतीत मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर एकूण सुमारे ८० मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सेक्टर अधिकारी अनिल गावडे यांनी सांगितले.

मतदान केंद्रांसाठी पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला असून, महिला व पुरुषांसाठी तसेच दिव्यांगासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांसाठी भोजन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता गृह, चहा, नाश्ता आदी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामपंचायतीमार्फतही विविध सुविधा मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पुरवण्यात आल्या असल्याचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांनी सांगितले. तसेच पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे बीट हवलदार किशोर तेलंग यांनी सांगितले.

दरम्यान, शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे, कासारी, धानोरे, विठ्ठलवाडी, टाकळी भीमा, घोलपवाडी, निमगाव म्हाळुंगी, कोंढापुरी, भांबर्डे, करंजावणे आदी गावातही निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशासनामार्फत विविध सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

05999

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Seena-Madha Irrigation: ‘गाढवाचंही लग्न होतंय, आमच्या पोरांचं काय?’; तुळशी ग्रामस्थांचा उद्विग्न सवाल; सीना-माढा योजनेत समावेशासाठी उपोषण

केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं भोवलं, ३२ वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल; पुणे पोलिसांनी पाठवली नोटीस

Ayodhya Ram Temple security upgrade: राम मंदिरासह महत्त्वाच्या आस्थापनांच्या सुरक्षेला बळ; महिला स्नायपर्स, PAC बटालियन आणि गनर्ससाठी अत्याधुनिक शस्त्रसाठा मंजूर

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Latest Marathi News Update : अमित शहा शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार, हुपरीत जंगी कार्यक्रम

SCROLL FOR NEXT