तळेगाव ढमढेरे, ता. २७ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील मुळेवाडी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. जिल्हाप्रमुख पूनम पोतले यांनी प्रथमच मुळेवाडी येथील महिलांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. विविध शासकीय विभागातील अडचणी, तसेच महिलांचे आरोग्य, महिलांची सुरक्षितता, शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता या विषयावर पोतले यांनी समुपदेशन केले. आगामी काळात शिवसेनेतर्फे महिलांच्या समस्या जाणून घेऊन अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पोतले यांनी सांगितले. बचत गटाच्या माध्यमातून शिलाई मशिन, बचत गटाला देण्यात येणारे कर्ज आदी विषयांवरही चर्चा केली. यावेळी महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख चेतना ढमढेरे, गवळीबाबा महिला बचत गटाचे अध्यक्ष पल्लवी मुळे, मनीषा मुळे, प्रांजल मुळे, ज्ञानेश्वरी मुळे, रोहिणी मुळे, संगीता गोखले, सुमन भुजबळ, जया भुजबळ, नमिता भुजबळ, आशा मुळे, नम्रता इंगळे, प्रार्थना मुळे, कांताबाई मुळे आदी उपस्थित होते. शिवसेना विभाग प्रमुख नितीन मुळे यांनी स्वागत केले. प्रभाकर मुळे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.