पुणे

तळेगावातील अपघातात अनोळखी पादचारी ठार

CD

तळेगाव ढमढेरे, ता. २५ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे शासकीय गोदामाजवळील न्हावरे रस्त्यावर अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसून अनोळखी पादचाऱ्याचा चिरडून मृत्यू झाला.
याबाबत पोलिस हवालदार किशोर तेलंग यांनी माहिती दिली की, तळेगाव ढमढेरे येथे न्हावरे रस्त्यावर सोमवारी (ता. २४) रात्री पायी चालणाऱ्या अनोळखी व्यक्तीस अज्ञात चारचाकी वाहनाची जोरात धडक बसली. या अपघातात संबंधित पादचारी वाहनाच्या चाकाखाली चिरडून जखमी झाला. त्यात त्याचा मृत्यू झाला. या व्यक्तीचे वय साधारण ३५ वर्षांचे असून, त्याच्या अंगात काळ्या रंगाचा टी-शर्ट व काळ्या रंगाची फुल पॅन्ट आहे. उजव्या हातात काळ्या रंगाचा करदोडा आहे. यासंदर्भात पोलिस पाटील पांडुरंग नरके यांनी येथील पोलिस दूरक्षेत्रात फिर्याद दिली आहे. अज्ञात वाहनचालक वाहनासह पळून गेला असून त्याच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Raj Thackeray meeting : संजय राऊत, राज ठाकरेंच्या भेटीला; महापालिका निवडणुकीनंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा?

Junk Food Cancer Myth: जंक फूड सोडलं म्हणजे कॅन्सरचा धोका संपला? डॉक्टरांनी सांगितले धक्कादायक सत्य, काळजी घ्या

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या नेर तालुक्यात बिबट्या विहरीत पडला

Viral News: मूळव्याध शस्त्रक्रियेनंतरही सुट्टी नाकारली! अखेर लोको पायलटने अधिकाऱ्यासमोरच काढली पँट; रेल्वेतील धक्कादायक प्रकार

Arjun Tendulkar Marriage: अर्जुन-सानियाचं लग्न! तेंडुलकर कुटुंब सजलं, मेहंदी-संगीत सोहळ्यासाठी सेलिब्रेटिंचीही हजेरी; Video Viral

SCROLL FOR NEXT