तळेगाव ढमढेरे, ता. २८ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) मुळेवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता झाली. सप्ताहाचे हे २५वे वर्ष साजरे करण्यात आले. येथील गवळीबाबा तरुण मंडळ व ग्रामस्थांतर्फे सप्ताहाचे आयोजन केले होते.
सप्ताहनिमित्त कलश पूजन व विना पूजन करण्यात आले. तसेच, दररोज अखंड वीणा नामस्मरण, काकडा भजन, हरिपाठ, कीर्तन व हरीजागर करण्यात आला. अविनाश साळुंके, बळिराम शिंदे, अश्विनी टाव्हरे यांचे कीर्तन झाले. अच्युत डोंगरे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाचा समारोप झाला. मुळेवाडी येथील गवळीबाबा तरुण मंडळ, तसेच तोडकर वस्ती, माळवाडी, साळूमाळी वस्ती, गुरव मळा, नरकेवाडी, अंबर मळा येथील ग्रामस्थ सप्ताहासाठी उपस्थिती होते. दररोज रात्री महाप्रसाद देण्यात आला. शिवसेना विभाग प्रमुख नितीन मुळे, नीलेश मुळे, शिवसेना उपविभाग प्रमुख दीपक इंगळे, राहुल मुळे, देविदास मुळे, संग्राम मुळे व ग्रामस्थांनी सप्ताहाचे संयोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.