तळेगाव ढमढेरे, ता.१५ : तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले उपबाजारात सोमवारी (ता.१४) दीड हजार शेळी, बोकड व मेंढ्यांची विक्री झाली.
सध्या बहुतांश ठिकाणी यात्रा उत्सव सुरू असल्याने बोकड व मेंढ्यांना मोठी मागणी आहे. आजच्या बाजारात शेळी व बोकडाला कमीत कमी १२००० हजार ते २१००० हजार रुपयांपर्यंत आणि मेंढीला कमीत कमी ६५०० ते १५००० हजार रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला, असे प्रशासक अरुण साकोरे, सचिव अनिल ढोकले व सहसचिव अनिल ढमढेरे यांनी दिली. बाजारात पुणे, अहिल्यानगर, सातारा, अलिबाग, मुंबई आदी जिल्ह्यातून शेळी, बोकड व मेंढ्या खरेदी करण्यासाठी व्यापारी आले होते. तसेच पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यातील मेंढपाळांनी व शेतकऱ्यांनी शेळी, बोकड व मेंढ्या विक्रीसाठी आणल्या होत्या.
दरम्यान, येथील उपबाजार शिरूर, हवेली, आंबेगाव, दौंड आदी तालुक्यातील पशुपालकांना फायदेशीर ठरत असल्याने मोठ्या प्रमाणात मेंढपाळ व शेतकरी शेळी, बोकड व मेंढी विक्रीसाठी आणत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.