पुणे

धानोरेत शेतकऱ्यांसाठी एक दिवशीय कार्यशाळा

CD

तळेगाव ढमढेरे, ता.२९: धानोरे (ता. शिरूर) येथे शेतकऱ्यांसाठी कृषी विभागामार्फत शेतामध्ये एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी हुमणी कीड नियंत्रण, योग्य बेणे निवड व जमीन मशागत पद्धत आणि तांत्रिक मार्गदर्शन कृषी अधिकारी प्रशांत दोरगे यांनी केले. शेतीशाळेत परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. जैविक कीडनाशकांचा वापर, विशेषतः ईपीएन. व बीव्हीएनच्या वापराबाबत प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तसेच ऊस पिकाच्या योग्य जातींची निवड व जमिनीच्या मशागतीमुळे उत्पादनात होणाऱ्या वाढीवरही चर्चा झाली.
यावेळी काशिनाथ ढमढेरे, सुभाष माशिरे, संभाजी माशिरे, कैलास दरेकर, विजय माशिरे, मधुकर कोंडे, बाळासाहेब माशिरे, सोनबा माशिरे, उमेश ढमढेरे, कैलास दरेकर, बाजीराव भोसुरे, शरद भोसुरे, जालिंदर ढमढेरे आदी शेतकरी व ग्रामस्थ सहभागी झाले होते.
समारोपप्रसंगी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना तज्ञांनी उत्तरे दिल्याने शेतकऱ्यांचे समाधान झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress in Action Mode : बिहार निवडणुकीसाठी विरोधकांच्या जागा वाटापाआधीच काँग्रेस 'अ‍ॅक्शन मोड'वर!

'संधी मिळाली तर मी नक्कीच अभिनय करेल' लक्ष्याच्या लेकीनं व्यक्त केली मनातली इच्छा, म्हणाली...'मी प्रयत्न केले पण...'

Heavy Rain: पूर अन् अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत किती मिळणार? काय आहे प्रक्रिया?

Nashik Monsoon : भांडी बाजारापर्यंत पुराचे पाणी; ५६ वर्षांपूर्वीच्या १९६९ च्या महापुराच्या रौद्र स्मृतींचा नाशिककरांना उजाळा!

Latest Marathi News Live Update : ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात सेंचुरीयन बिझनेस पार्कला लागली आग

SCROLL FOR NEXT