पुणे

तळेगाव ढमढेरे महाविद्यालयात महिला सबलीकरण कार्यशाळा

CD

तळेगाव ढमढेरे, ता. ९ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार योजनेअंतर्गत महिला सबलीकरण व सक्षमीकरण या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा आयोजित केली होती.
या कार्यक्रमाच्या प्रमुक पाहुण्या म्हणून पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. संज्योत आपटे, तर अध्यक्षस्थानी विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. आपटे म्हणाल्या, ‘‘देशातील महिलांची प्रतिष्ठा जोपासणे ही समाजातील सर्वच घटकांची नैतिक जबाबदारी आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची गरज ओळखून आवश्यक उपक्रम राबविण्यात पुणे विद्यापीठ पुढाकार घेत आहे. ही कौतुकास्पद बाब आहे. समाजाच्या सर्वच क्षेत्रात आज महिला वर्ग सक्षमतेने कार्यरत आहे. सर्वच क्षेत्रांमध्ये महिलांना संधी मिळाल्यास त्या आपले कर्तृत्व निश्चितच सिद्ध करतील. परंपरेने महिला वर्गावर लादलेले पुरुषप्रधान संस्कृतीचे जोखड आता बाजूला ठेवण्याची वेळ आलेली आहे. अशा परिस्थितीत धाडसाने देशातील महिलावर्ग सर्वत्र आपले कर्तृत्व गाजवत आहेत.’’
यावेळी डॉ. जयश्री पाटील, प्राचार्य अर्जुन मुसमाडे, उपप्राचार्य पराग चौधरी, प्रा. अश्विनी पवार आदी उपस्थित होते.
यावेळी संचालक महेश ढमढेरे यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य अर्जुन मुसमाडे यांनी स्वागत केले. प्रा. अश्विनी पवार यांनी प्रस्तावित केले. प्रा. कांचन गायकवाड यांनी सूत्रसंचालन, तर प्रा. सारिका जेधे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravichandran Ashwin IPL Retirement : रविचंद्रन अश्विनचा IPL ला देखील रामराम! 8 महिन्यात घेतला दुसरा मोठा निर्णय

Lasalgaon News : श्रीलंकेने कांद्यावरील आयात शुल्क वाढवले; भारतीय कांदा निर्यातदारांना फटका

Pune News : पुण्यात गणेशोत्सव काळात मद्यविक्रीस बंदी; कायदा सुव्यवस्थेसाठी निर्णय

Ganpatipule Travel: गणेशोत्सवात गणपतीपुळेच्या दर्शनासाठी जाताय? या जवळच्या ठिकाणांना देखील भेट द्या!

Raigad News: परंपरेचा व तंत्रज्ञानाचा सुरेख संगम; बाप्पाच्या दर्शनाचे डिजिटल आग्रहाचे आमंत्रण, डिजिटल बॅनर व व्हिडिओद्वारे आमंत्रणाचा ट्रेंड

SCROLL FOR NEXT