पुणे

जलसंधरणाच्या कामांमुळे कासारी गाव बनले जलसमृद्ध

CD

तळेगाव ढमढेरे, ता.२९ : कासारीतील (ता.शिरूर) ओढ्याचे खोलीकरण व साखळी आणि सिमेंट बंधारे बांधल्यामुळे गाव जलसमृद्ध बनले आहे. शाश्वत सिंचनासाठी पाण्याची सोय झाली आहे. पिण्यासाठी तसेच शेतीसाठी पाण्याची सोय झाली आहे. जलसंधारणाच्या कामामुळे बहुतांश शेती ओलिताखाली येण्यास मदत झाली आहे. पुरेसा पाऊस पडल्याने ओढे-नाले तुडुंब भरले असून, पाणीटंचाई चालू वर्षी तरी दूर झालेली आहे.

ओढ्यातील गाळ काढल्याने पाण्याची पातळी वाढली आहे. बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी अडवून भूगर्भात पाणी साठा वाढण्यास मोठी मदत झाली आहे.
कासारीतील माळवाडी, दगडे वस्ती, साबळे वस्ती, सातपुते वस्ती, रासकर मळा, होले वस्ती, वसुमळा, सोनार मळा, निवसे वस्ती, रासकर वस्ती आदी परिसरातील ओढ्यावर साखळी व सिमेंट बंधारे बांधून ओढ्याचे रुंदीकरण व खोलीकरण करण्यात आले.
चालू वर्षात. परिणामी शेतकऱ्यांनी ऊस, विविध फळबागा, जनावरांसाठी चारा पिके, भाजीपाला आदी खात्रीशीर पिके घेतली असून यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.
कासारी हे गाव जिरायती पट्ट्यातील चासकमानच्या पाण्यावर अवलंबून आहे. गावचे भौगोलिक क्षेत्र विस्तृत असून ओढे व नाले मोठे आहेत. या परिसरात पावसाचे प्रमाण अल्प आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन शासकीय यंत्रणा व इतर सामाजिक संस्थांमार्फत निधी उपलब्ध करून जलसमृद्ध गाव करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

दरम्यान, जलसंधारणासाठी शासकीय योजना, सामाजिक संस्थांची मदत, जॉन डिअर कंपनी याचबरोबर ‘शिक्रापूर येथील वॉटर शेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट’ या संस्थेच्या सीएसआर फंडातून तसेच मृद व जलसंधारण विभागामार्फत साखळी व सिमेंट बंधारे बांधण्यात आले.

गावात ‘शिरपूर पॅटर्न’
सकाळ माध्यम समूहाच्या ‘सकाळ रिलीफ फंडा’तर्फे सन २०११ मध्ये कासारीतील शासकीय तलावातील गाळ काढल्याने तलावातील पाण्याचा साठा वाढला. येथील शाश्वत पाण्याचा आधार घेत ग्रामपंचायतीने तलावा शेजारीच विहीर खोदली आणि तेथून गावाला पाणीपुरवठा करण्याची योजना राबवली. याच काळामध्ये तत्कालीन आमदार ॲड.अशोक पवार यांच्या पुढाकाराने व ग्रामपंचायतच्या सहकार्याने ‘शिरपूर पॅटर्न’ राबविला. याच काळात धारीवाल फाउंडेशनतर्फे ओढ्याचे खोलीकरण करण्यात आले. तेव्हापासून गावातील जलसंधारणास सुरुवात झाली.


गेल्या पंचवार्षिकमध्ये कासारी ‘जलसमृद्ध’ करण्यासाठी गावचे आजी-माजी पदाधिकारी, अधिकारी, निमशासकीय (एनजीओ) पदाधिकारी व अधिकारी, पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे आजी- माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने विशेष प्रयत्न करण्यात आले."
- वसंत पवार, ग्रामसेवक


07818

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT