पुणे

मुख्याध्यापक पवार यांना क्रीडारत्न पुरस्कार प्रदान

CD

तळेगाव ढमढेरे, ता. ८ : निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील श्रीमती बबईताई टाकळकर प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक झेंडू पवार यांचा मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडारत्न पुरस्काराने नुकतेच पुणे येथे सन्मानित करण्यात आले.
क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रशिक्षक, मार्गदर्शक व खेळाडू यांना मिशन ऑलिंपिक गेम्स असोसिएशन इंडिया, दिल्ली पॅरामेडिकल बोर्ड (भारत सरकार) यांच्यावतीने राष्ट्रीय स्तरावरील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडारत्न पुरस्कार दिला जातो. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त कुस्ती क्षेत्रातील नामवंत खेळाडू, मार्गदर्शक, प्रशिक्षक असलेले मुख्याध्यापक पवार हे सध्या पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष असून, त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार दिला आहे.
राष्ट्रीय स्तरावरील क्रीडारत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल इतर मागास बहुजन कल्याण विभाग पुणे यांच्या वतीने पहिल्याच भटक्या विमुक्त दिनानिमित्त पुणे येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात पवार यांना पुरस्कार दिला. पवार यांना सहाय्यक संचालक संतोष हराळे, प्रादेशिक उप संचालक खुशाल गायकवाड, सहाय्यक संचालक प्रदीप संकपाळ, लेखक भरत विटकर यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तसेच, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार सूर्यकांत पलांडे, संस्थेचे पदाधिकारी व संचालक तसेच क्रीडा प्रेमींनी पवार यांचे अभिनंदन केले.

08028

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे–बंगळूर प्रवास आता फक्त सात तासांत! तब्बल 55 हजार कोटींचा नवा आठपदरी महामार्ग ठरणार गेमचेंजर, महाराष्ट्र-कर्नाटकातून जाणार मार्ग

Sugarcane Price Protest Video : कोल्हापुरात ऊसदर आंदोलनाचा भडका, शिरोळ तालुक्यात ऊस वाहतुकीची तीन वाहने पेटवली

Solapur Accident:'भावी अभियंत्याचा दुचाकी अपघातात मृत्यू'; सुट्टीला आल्यावर मरवडे रोडवर घटना, वडिलांचे स्वप्न संपलं

"असिस्टंट दिग्दर्शक म्हणून सचिन यांचं नावंही शोलेच्या यादीत नाही" ज्येष्ठ सिनेसमीक्षकाचा धक्कादायक खुलासा

Solapur News: 'साेलापूर जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा'; उर्वरित ४७ टक्के शेतकऱ्यांच काय?

SCROLL FOR NEXT