पुणे

निमगाव म्हाळुंगीत चार शेळ्यांचा मृत्यू

CD

तळेगाव ढमढेरे, ता. ५ : निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील चौधरी वस्तीवरील नामदेव चौधरी यांच्या राहत्या घरासमोरील गोठ्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात चार शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. बुधवारी (ता. ५) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
पहाटेच्या सुमारास बिबट्याने येथील गोठ्यात खिडकीतून उडी मारून चार शेळ्यांवर ताव मारला. कुत्र्यांच्या आवाजाने घरातील माणसे जागी झाली. माणसांचा आवाज आल्यानंतर बिबट्याने मृत शेळ्या गोठ्यातच सोडून धूम ठोकली. चार शेळ्यांचा मृत्यू झाल्याने चौधरी कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले असून, बिबट्याच्या हल्ल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकाच वेळी काही क्षणात चार शेळ्या ठार केल्याने बिबट्यांची संख्या जास्त असल्याची शंका चौधरी कुटुंबाने व पोलिस पाटील किरण काळे यांनी व्यक्त केली आहे. वनपाल गौरी हिंगणे, वनरक्षक प्रमोद पाटील, सरपंच सचिन चव्हाण, पोलिस पाटील किरण काळे व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत मृत शेळ्यांचा पंचनामा करण्यात आला.
दरम्यान, गेल्या वर्षभरापासून निमगाव परिसरात बिबट्यांचे वास्तव्य वाढले असून अनेक वेळा शेतकऱ्यांना रात्री व दिवसा बिबट्यांचे दर्शन झाले आहे. आतापर्यंत येथील परिसरात बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ला करून अनेकांचे जीव घेतले आहेत. सुदैवाने मानवी जीवित हानी अद्याप झालेली नाही. पिंपरखेड येथील बिबट्याने केलेला हल्ला ताजा असतानाच निमगाव म्हाळुंगी मध्ये एकाच वेळी चार शेळ्या बिबट्याने ठार केल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. बिबट्याच्या हल्ल्याने वास्तव्याने व दररोजच्या दर्शनाने नागरिक धास्तावले आहेत. बिबट्या पकडण्यासाठी पिंजऱ्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी पोलिस पाटील किरण काळे यांनी केली आहे.

आमच्याकडे दिला एकच पिंजरा
तळेगाव ढमढेरे, शिक्रापूर, कासारी, निमगाव म्हाळुंगी, विठ्ठलवाडी, टाकळी भीमा, दहिवडी, पारोडी आदी गावांसाठी वन विभागाने आमच्याकडे एकच पिंजरा दिला असून परिसरात बिबट्यांची संख्या वाढल्याने पिंजऱ्यांची संख्या वाढवावी असे पत्र वरिष्ठ कार्यालयाला दिले असल्याचे वनपाल गौरी हिंगणे व वनरक्षक प्रमोद पाटील यांनी सांगितले.


...अन्यथा रास्ता रोको आंदोलन
शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे, धानोरे, विठ्ठलवाडी, टाकळी भीमा, कासारी, शिक्रापूर, कोंढापुरी, भांबर्डे, करंजावणे, दहिवडी, पारोडी, रांजणगाव गणपती आदी परिसरात गेल्या वर्षभरात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून विविध ठिकाणी बिबट्यांचे वास्तव्य वाढल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षभरात विविध गावातील परिसरात बिबट्याने सुमारे १०० पेक्षा अधिक पाळीव प्राण्यांवर हल्ले केले आहेत. वनविभागाने त्वरित दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा व होणारी जीवित व वित्तहानी टाळावी अन्यथा लवकरच या सर्व गावातील नागरिक रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचे विविध गावच्या सरपंचांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Women’s Team Meets PM Modi : विश्व विजयानंतर 'टीम इंडिया'ने घेतली पंतप्रधान मोदींची भेट अन् झाली दिलखुलास चर्चा!

Unhealthy Ration : गोरगरिबांच्या आरोग्याशी खेळ; सुधागडात रास्तभाव दुकानातील धान्यात चक्क जिवंत अळ्या व लेंड्या!

Pune News : मुलासह दोन महिन्यांत सासरी परतण्याचे पत्नीला न्यायालयाचे आदेश; पतीचा अर्ज मंजूर

Maharashtra Politics : सोलापुर जिल्ह्यातील भाजप उमेदवाराचे एबी फॉर्म शशिकांत चव्हाण यांच्याकडे सुपूर्त!

Mohammed Shami: ३ सामन्यात १५ विकेट्स... शमीचा परफॉर्मन्स जबर, तरी संघाबाहेर! आगरकर-गंभीर वादामुळे ‘क्लीन बोल्ड’?

SCROLL FOR NEXT