पुणे

बाजार समितीच्या इमारतीची तळेगाव ढमढेरे येथे डागडुजी

CD

तळेगाव ढमढेरे, ता. २४ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले उपबाजारातील मुख्य इमारतीच्या पाठीमागील भिंतीची अखेर डागडुजी करून दुरुस्ती करण्यात आली आहे.
याबाबत ‘सकाळ’मध्ये २ नोव्हेंबर रोजी ‘मनोहर असे तरी इमारत दिसे उदास’, या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. याची त्वरित दखल घेत बाजार समितीचे सचिव अनिल ढोकले व सहाय्यक सचिव अनिल ढमढेरे यांनी बाजार समितीच्या पाठीमागील भिंतीची १५ दिवसांत डागडुजी करून दुरुस्ती केली आहे. भिंतीला रंगकाम करून सुशोभीकरण केले आहे. तसेच, येथील आवारात नवीन स्वच्छतागृह बांधले आहे.
इमारतीच्या पाठीमागच्या भिंतीची प्रचंड दुरवस्था झाली होती. प्लास्टर उखडून विटा दिसत होत्या. त्यामुळे इमारतीला ओंगळ स्वरूप आले होते.
दरम्यान, वर्ष १९७७मध्ये शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तळेगाव ढमढेरे येथील महात्मा फुले उप बाजार समितीच्या मुख्य इमारतीची उभारणी केली आहे. त्यानंतरच्या काळात इमारतीचे सुशोभीकरण करून इमारतीसमोर महात्मा जोतिराव फुले यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करून मेघडंबरी बसवण्यात आली आहे. शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर सध्या प्रशासक असून, ‘सकाळ’च्या बातमीनंतर त्वरित दखल घेऊन प्रशासनामार्फत दुरवस्था झालेल्या इमारतीच्या भिंतीची दुरुस्ती व सुशोभीकरण केल्याने शेतकरी, व्यापारी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

08388

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक पूर्ण; पहिला ड्रोन व्हिडिओ आला समोर, उद्घाटनाची तारीख काय?

Salman Agha Runout: आधी रनआऊट झाला अन् मग हेल्मेट फेकलं... पाकिस्तानच्या सलमान आघावर ICC ची कारवाई

Maharashtra State Cooperative Bank : राज्य बँक ठरली यूपीआय स्वीकारणारी देशातील पहिली शिखर बँक

LPG Gas: गॅस तुटवड्याच्या काळात उज्ज्वला गॅस योजनेचं काय झालं? खडसे यांनी उपस्थित केला महत्त्वाचा मुद्दा, म्हणाल्या...

VIDEO : लिफ्टमध्ये अडकला सात महिन्यांच्या चिमुकल्याचा हात, पुण्यातील घटना; धडकी भरवणारा व्हिडीओ समोर...

SCROLL FOR NEXT