पुणे

‘तळेगावचा बाजार पटांगणात भरवावा’

CD

तळेगाव ढमढेरे, ता. १६ : येथे दर सोमवारी राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला भरणारा आठवडा बाजार वेशीच्या आत गावात असलेल्या महत्त्वाच्या पटांगणात भरवावा, अशी मागणी व्यापारी संघटनेने ग्रामपंचायतीकडे मंगळवारी केली.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील बाजारतळातून शिक्रापूर- न्हावरे हा राष्ट्रीय महामार्ग जात असून, त्याचे काम प्रगतिपथावर आहे. या महामार्गालगत दर सोमवारी भरणारा आठवडा बाजार गावातील जनसेवा चौक, दुर्गा आळी पटांगण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक वेशीच्या वर, जय बजरंग मंडळ आणि भीमाशंकर मंडळाचे पटांगण आदी ठिकाणी गावात वेशीत आठवडा बाजार भरवावा, अशा प्रकारचे निवेदन व्यापारी संघटनेतर्फे ग्रामपंचायतीला दिले आहे. निवेदनावर सुमारे ९० व्यापारी व दुकानदारांच्या सह्या आहेत. सरपंच रोहिणी तोडकर यांनी व्यापारी संघटनेने दिलेले निवेदन स्वीकारले.
आम्ही सुचवल्याप्रमाणेच वेशीच्या आत पटांगणात बाजार भरवावा इतरत्र बाजार कुठेही नेऊ नये, असे व्यापारी संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT